ETV Bharat / entertainment

आमिर खानचा जावई नुपूर शिखरेनं केला लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ - आमिर खान

Ira khan and nupur shikhare wedding : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. या लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या लग्नातील पायजमा पार्टीमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Ira khan and nupur shikhare wedding
आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 1:09 PM IST

मुंबई - Ira khan and nupur shikhare wedding : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील लेक सिटी, उदयपूर येथील ताज लेक पॅलेस या आलिशान पॅलेसमध्ये पार पडत आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा 3 जानेवारीला नोंदणीकृत विवाह मुंबईत झाला होता. आता 10 जानेवारीला या जोडप्याचा शाही विवाह होणार आहे. याआधीही या जोडप्याच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ एकामागून एक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता आयरा खानच्या लग्नातील पायजमा पार्टीमधील व्हिडिओ समोर आला आहे.

नुपूरचा लुंगी डान्स : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नुपूर शिखरे हा शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस' या हिट चित्रपटातील 'लुंगी डान्स' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या पार्टीतून नुपूर शिखरेची धमाल स्टाइल पुन्हा एकदा समोर आली आहे. याशिवाय या लग्नात 'मेड इन हेवन 2', आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री जैन मेरी खान देखील या वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे. जैन मेरी ही आमिर खानची भाची आणि आयरा खानची चुलत बहीण आहे. जैन ही सोशल मीडियावर आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.

आयरा खान आणि नुपूरच्या लग्नातील पायजमा पार्टी : याआधी आयरा खाननं लग्नाच्या निमंत्रणाचं कार्ड शेअर केलं होतं. या कार्डनुसार, आज संध्याकाळी 7 वाजता या जोडप्याचा संगीत सोहळा होणार आहे. या संगीत सोहळ्यात आमिर खान आपल्या मुलीसाठी गाणं गाणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय आमिर खानची बहीण निखत खान हेगडेही डान्स परफॉर्म करणार असल्याची माहिती मिळत आहे. यानंतर, 10 जानेवारीला हे जोडपे शाही पद्धतीनं लग्न करणार आहे. यापूर्वी आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती आयरा आणि नुपूरसाठी गाणं गाताना दिसली होती. या गाण्यावर या जोडप्यानं सुंदर डान्स देखील केला होता.

हेही वाचा :

  1. जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा आणि धनुष यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण
  2. 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांची ब्लॉकबस्टर ऑफर , 'इतक्या' पैशात पाहू शकाल चित्रपट
  3. 'सालार' सक्सेस पार्टीत प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत कापला केक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.