मुंबई : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट 1990 च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून प्रेक्षक इतके भावूक झाले की, त्यांना अश्रू अनावर झाले. रिलीजपूर्वी जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. आता विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत जाहीर केले की, काश्मीर फाइल्स 19 जानेवारी रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
-
ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles is re-releasing on 19th January - The Kashmiri Hindu Genocide Day. This is the first time ever a film is releasing twice in a year. If you missed watching it on BIG SCREEN, book your tickets NOW👇. https://t.co/LP0NKokbaehttps://t.co/J7s03w8P31 pic.twitter.com/TNxhq0L68V
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles is re-releasing on 19th January - The Kashmiri Hindu Genocide Day. This is the first time ever a film is releasing twice in a year. If you missed watching it on BIG SCREEN, book your tickets NOW👇. https://t.co/LP0NKokbaehttps://t.co/J7s03w8P31 pic.twitter.com/TNxhq0L68V
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 18, 2023ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles is re-releasing on 19th January - The Kashmiri Hindu Genocide Day. This is the first time ever a film is releasing twice in a year. If you missed watching it on BIG SCREEN, book your tickets NOW👇. https://t.co/LP0NKokbaehttps://t.co/J7s03w8P31 pic.twitter.com/TNxhq0L68V
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 18, 2023
काश्मीर फाइल्स पुन्हा रिलीज होणार : चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात की 1990 मधील काश्मिरी नरसंहार हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे तो पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते. सोशल मीडियावर विवेक अग्हिहोत्री यांनी ट्विट केले. '#TheKashmirFiles 19 जानेवारी - काश्मिरी हिंदू नरसंहार दिवस पुन्हा प्रदर्शित होत आहे. वर्षातून दोनदा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर तुम्ही तो मोठ्या स्क्रीनवर पाहायला चुकले असाल तर तुमची तिकिटे आत्ताच बुक करा.' दिग्दर्शकाने एक ग्राफिक देखील शेअर केले. त्यामध्ये असे लिहिले आहे- 'लोकांच्या मागणीनुसार, लोकांचा ब्लॉकबस्टर.'
-
Probably for the first time a film releases a second time in the same year. Please watch #TheKashmirFiles releasing tomorrow again to pay tribute to #33YearsOfKPEXodus!🙏💔 pic.twitter.com/neXPYxniVx
— Anupam Kher (@AnupamPKher) January 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Probably for the first time a film releases a second time in the same year. Please watch #TheKashmirFiles releasing tomorrow again to pay tribute to #33YearsOfKPEXodus!🙏💔 pic.twitter.com/neXPYxniVx
— Anupam Kher (@AnupamPKher) January 18, 2023Probably for the first time a film releases a second time in the same year. Please watch #TheKashmirFiles releasing tomorrow again to pay tribute to #33YearsOfKPEXodus!🙏💔 pic.twitter.com/neXPYxniVx
— Anupam Kher (@AnupamPKher) January 18, 2023
अनुपम खेर यांचे काश्मीर फाईल्स री-रिलीजवरचे ट्विट : अनुपम खेर यांनीही ट्विटरवर काश्मीर फाइल्स दुसऱ्यांदा प्रदर्शित होत असल्याचे उघड केले होते. काश्मिरी पंडित निर्गमनाला 33 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. खेर यांनी ट्विट केले होते की, 'कदाचित पहिल्यांदाच चित्रपट दुसऱ्यांदा त्याचवर्षी प्रदर्शित होत आहे. कृपया #33YearsOfKPEXodus ला श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या पुन्हा प्रदर्शित होणारा #TheKashmirFiles पाहा!🙏💔."
काश्मीर फाईल्स बद्दल : विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, द काश्मीर फाईल्स हा चित्रपट 1990 च्या दशकात भारत-प्रशासित काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराभोवती फिरते. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या वेदना तसेच त्या काळातील राजकारण मांडतो. यापूर्वी विवेकने माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनावर आधारित 'द ताश्कंद फाइल्स' हा चित्रपटही बनवला आहे. विवेक अग्निहोत्रीने फ्रँचायझीमधील दुसऱ्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. द दिल्ली फाइल्स असे या चित्रपटाचे नाव असेल. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : पठाणच्या आगाऊ बुकिंगला परदेशात दमदार सुरुवात