मुंबई - 2018 - Every is a Hero : टोविनो थॉमस स्टारर '2018 - एव्हरी इज ए हिरो' या चित्रपटानं ऑस्कर 2024 साठी अधिकृत एंट्री घेतली आहे. हा चित्रपट मॉलीवुडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपट 2018 च्या केरळ पूरावर आधारित आहे. हा चित्रपट ज्युड अँथनी जोसेफ यांनी दिग्दर्शित केला होता. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपट मल्याळम भाषेनंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये टोविनो थॉमस व्यतिरिक्त कुंचको बोबन, तन्वी राम आणि अपर्णा बालमुरली यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकराल्या आहेत. या चित्रपटानं जगभरात 200 कोटीची कमाई केली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मल्याळम चित्रपटाची उल्लेखनीय कामगिरी : '2018 - एव्हरी इज ए हिरो' या चित्रपटाचा खूप क्रेझ होती. या चित्रपटानं देशांतर्गत खूप जलद गतीनं 100 कोटींचा टप्पा गाठला होता. या मल्याळम चित्रपटानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपटाची निर्मिती वेणू कुनापिली यांनी केली. काव्या फिल्म कंपनीच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटानं जगभरात जबरदस्त कमाई केली. उन्नी मुकुंदनच्या पौराणिक नाटक 'मलिकाप्पुरम'च्या यशानंतर हा चित्रपट काव्याचा दुसरा बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर आहे. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपटाला समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट आहे.
'2018 - एव्हरी इज ए हिरो'ची ऑस्करसाठी एंट्री : '2018 - एव्हरी इज ए हिरो' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटांमध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी स्पर्धा करेल. दरम्यान 2002 मध्ये लगान पासून, ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी कोणत्याही भारतीय चित्रपटाला नामांकन मिळालेले नाही. याआधी, इतर फक्त दोन चित्रपटांनी अंतिम पाचमध्ये स्थान मिळवले होते. या चित्रपटांमध्ये नर्गिस अभिनीत 'मदर इंडिया' आणि मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे!' यांचा समावेश होता. 96वा ऑस्कर 10 मार्च 2024 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे. ऑस्कर 2024 साठी मल्याळम चित्रपट '2018 - एव्हरी इज ए हिरो' निवडण्यापूर्वी, 'केरळ स्टोरी', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, बालगम (तेलुगु), वाळवी (मराठी), बापल्योक (मराठी) अशा 22 चित्रपटांवर विचार करण्यात आला होता, मात्र सरतेशेवटी ' 2018 एव्हरीवन इन अ हिरो' जिंकला आणि या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये भारताकडून अधिकृत प्रवेश मिळाला आहे.
हेही वाचा :