मुंबई - भारतामध्ये लोकसंख्या वाढीमुळे, आता तर आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश झालोय. नोकऱ्या आणि नोकरी शोधणारे यांच्यातील प्रमाण व्यस्त आहे. आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी ९०% लोकांना नोकरीची गरज असते. परंतु प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा सरकारी नोकरी मिळविण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु तेथे इतकी मोठी स्पर्धा असते की बऱ्याच जणांना माहीत नसते की त्यासाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जायचे. परंतु अनेक मार्गदर्शक क्लासेस उपलब्ध असतात ज्यांचा फायदा प्रत्येकाला घेता येत नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
एमपीएससी परीक्षेत मुसंडी मारणे आवश्यक - शासकीय जॉब्ससाठी एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा असतात. परंतु त्यात हमखास यश मिळवण्याचा फॉर्म्युला किंवा पॅटर्न नसतो. मेहनतीला पर्याय नाही म्हणतात, ते या परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी नकीच जाणतात. तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे असते आणि त्याच्या पूर्ततेसाठी अथक मेहनत घेणे त्याहूनही महत्त्वाचे असते. आणि यासाठी मुसंडी मारणे अधिक गरजेचे असते. मुसंडीवरून आठवले की 'मुसंडी' नावाचा चित्रपट येऊ घातला आहे आणि त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून वरील विषयाला हात घातला असून फक्त यशस्वी होण्यासाठी नव्हे तर या स्पर्धेत अपयश आलेल्या मुलांना ते कसे पाचवायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. अर्थात हा चित्रपट डोळ्यात अंजन घालीत मनोरंजन सुद्धा करेल अशी ग्वाही दिग्दर्शक देतात.
मुसंडी दिग्दर्शकांचे विचार - दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, 'हल्लीचे युग स्पर्धेचे आहे. जो या स्पर्धेत मुसंडी मारू शकतो तो आयुष्यात उंची गाठतो. परंतु या स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. आणि त्यांची दखल घेणे हे सामाजिक स्वास्थासाठी गरजेचे आहे. मुसंडी प्रामुख्याने या विषयावर भाष्य करतो. हा चित्रपट प्रत्येकामध्ये आत्मविश्वास वाढवेल असे मला वाटते.'
दिग्गज कलाकारांसह नवोदितांची मुसंडी - 'मुसंडी च्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे गोवर्धन दोलताडे यांनी तर याची प्रस्तुती आहे सोनाई फिल्म क्रिएशन च. यात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि गायत्री जाधव असून सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे, राम गायकवाड, अजित पवार, उत्कर्ष देशमुख, सार्थक वाईकर, आर्यन पवार, निमिशा सानप, रुचिता देशमुख, प्रियंका पवार, ऐश्वर्या फटांगरे, श्रद्धा गायकवाड, सोनाली गायकवाड, आकांक्षा कापे, प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे, भाग्यश्री पवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २६ मे ला मुसंडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - Salman Khan News : कुणाबरोबर काम करणे आवडत नसेल तर सलमान खान काय करतो? आश्चर्यजनक केला खुलासा