ETV Bharat / entertainment

Sushmita Sen Heart Attack : सुष्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका, वडिलांच्या शहाणपणाच्या शब्दांनी मिळाले धैर्य - सुष्मिता सेन ह्रदय शस्त्रक्रिया

अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. तिच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमुळे ही माहिती उघड झाली आहे. आपले हृदय मोठे असल्याचा दिलासा डॉक्टरने दिल्याचेही तिने म्हटलंय.

Sushmita Sen had a heart attack
Sushmita Sen had a heart attack
author img

By

Published : Mar 2, 2023, 5:08 PM IST

Updated : Mar 2, 2023, 5:41 PM IST

मुंबई - सौंदर्यवती अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. आजवर ही गोष्ट तिन गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र तिच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमुळे ही माहिती उघड झाली आहे. आपले हृदय मोठे असल्याचा दिलासा डॉक्टरने दिल्याचेही तिने म्हटलंय.

सुष्मिताला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. एक पोस्ट शेअर करून त्याने आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे तिने सांगितले. तिची तब्येत इतकी खालावली होती की अखेर तिच्या ह्रदयाची अँजिओप्लास्टी करावी लागली. सध्या सुष्मिताची प्रकृती ठीक आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर काही एक पोस्ट लिहिली आहे. यात सर्वात पहिल्यांदा तिने आपल्या वडिलांनी सांगितलेले शहाणपणाचे शब्द अधोरेखीत केले आहेत. सुष्मिताने तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. तिने लिहिलंय, 'तुझे हृदय आनंदी आणि संयमी ठेव, आणि जेव्हा तुला या शोनाची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तुझ्या पाठीशी उभे राहिल, हे माझ्या वडिलांचे शहाणपणाचे शब्द आहेत', असे सुश्मिता सेनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

पुढे तिने आपल्याला हृदयविकाराचा झटका आला होता याचा खुलासाही केलाय. तिने लिहिलंय, 'मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर माझी अँजिओप्लास्टी सर्जरी झाली. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी ‘माझे हृदय मोठे आहे’ याची खात्री करुन दिली. या कठीण काळात वेळेवर मदत आणि विधायक कृतीबद्दल आभार मानण्यासाठी बरेच लोक आहेत.', असे सुश्मिताने म्हटलंय.

ही पोस्ट फक्त तुम्हा माझ्या शुभचिंतकांना आणि प्रियजनांना चांगल्या बातमीची माहिती देण्यासाठी आहे ... की सर्व काही ठीक आहे आणि मी पुन्हा काही आयुष्यासाठी तयार आहे!!! , असेही तिने पुढे म्हटलंय.

ही बातमी सोशल मीडियातून कळल्यानंतर सुष्मिता सेनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपण ठिक असल्याचे कळवले आहे. तिने ही पोस्ट लिहिल्यानंतर तिच्या कमेंट सेक्शनमध्ये ती बरी व्हावी यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटीजसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री गौहर खानने, तू लढाऊ आहेस, लवकरच पहिल्यापेक्षाही बरी होशील, असे लिहिलंय. लाखो फॉलोअर्स तिच्यासाठी सदिच्छा पाठवत आहेत.

हेही वाचा - Tu Jhoothi Main Makkaar : कार्तिक आर्यन रणबीर श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'मध्ये दिसणार! वास्तव काय आहे ते जाणून घ्या

Last Updated : Mar 2, 2023, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.