मुंबई : सनी देओलचा 'गदर 2' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आता सनी देओलचे चाहते त्याच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अलीकडेच 'बॉर्डर' च्या सीक्वलबद्दल चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, नुकताच सनी देओल हा डिंपल कपाडिया आणि अमृता सिंगसोबत स्पॉट झाला. यापूर्वी सनीचे नाव डिंपलशी देखील जोडण्यात आलं होतं. सनी देओल आणि डिंपल बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते, असं देखील बोललं जातं. सनी आणि डिंपलच्या व्हेकेशनच्या फोटोंनीही सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होते. तसेच अमृता सिंग देखील सनी देओलची कथित एक्स गर्लफ्रेंड होती. सनी आणि अमृता दोघांनीही एकाच चित्रपटातून नायक-नायिका म्हणून पदार्पण केलं होतं. सनी, डिंपल, अमृता हे तिघं एकत्र चित्रपटात काम करणार असल्याचा अंदाज देखील बांधला जातोय.
सनी देओल डिंपल कपाडियाच्या घराबाहेर झाला स्पॉट : सनी आणि अमृता हे डिंपलच्या घराबाहेर स्पॉट झाल्यानंतर या तिघांबद्दल चर्चा होऊ लागली आहे. हे तिघे एकत्र रात्री बाहेर गेले होते. त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सनी देओल, डिंपल कपाडिया आणि अमृता सिंग हे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. दरम्यान डिंपल कपाडिया इमारतीतून बाहेर पडताच सनी देओलच्या कारमध्ये बसली. या गाडीत तिच्यासोबत अमृता देखील होती. यादरम्यान पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे कलाकार पोझ देण्याच्या मूडमध्ये नव्हते. यावेळी तिघेही खूप घाईत दिसले.
अमृता सिंगने सनी आणि डिंपल डेट करत असल्याचा केला दावा : सनी देओल जुहू पीव्हीआरच्या बाहेर दिसला. त्यानंतर डिंपल देखील चित्रपटगृहाबाहेर स्पॉट झाली. आता काही चाहत्यांना वाटतंय की ही तिघं सनीचा चित्रपट 'गदर 2' पाहण्यासाठी गेले असावेत. काही चाहते सोशल मीडियावर या पोस्टवर कमेंट करत म्हणत आहे की, त्यांनी अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' चित्रपट पाहिला असेल. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी 80 च्या दशकात 'अर्जुन', 'आग को गोल', 'मंझिल मंझिल', 'नरसिंहा' आदी चित्रपटांत एकत्र काम केले होते. सनी देओलची कथित एक्स गर्लफ्रेंड अमृता सिंगने यापूर्वी सनी आणि डिंपल डेट करत असल्याचा दावा केला होता.
हेही वाचा :