ETV Bharat / entertainment

Subhash Ghai recalls Shikhar : शाहरुखसह शिखर चित्रपटाचा केला होता मुहूर्त, सुभाष घईंनी सांगितला न बनलेल्या सिनेमाचा किस्सा - Subhash Ghai latest news

Subhash Ghai recalls Shikhar : सुभाष घई यांनी शाहरुख खानला घेऊन शिखर या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचा मुहूर्तही पार पडला पण चित्रपट बनू शकला नाही. याची खंत सुभाष घईंना आहे. हा चित्रपट का रखडला याचा किस्सा त्यांनी सांगितलाय.

Subhash Ghai recalls Shikhar
शाहरुखसह शिखर चित्रपटाचा केला होता मुहूर्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 5:39 PM IST

मुंबई - Subhash Ghai recalls Shikhar बऱ्याच वेळेला निर्माते चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा वाजत गाजत करतात, पण चित्रपटाच्या निर्मितीत काही अनेपेक्षीत अडचणी निर्माण होऊन केलेले श्रम वाया जातात. असाच अनुभव ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक सुभाष घई यांचाही आहे. ९० च्या दशकात सुभाष घई हे नाव निर्मिती ७ क्षेत्रात खूप महत्त्वाचं होतं. त्यांनी शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफला घेऊन शिखर या महत्त्वकांक्षी चित्रपट निर्माण करत असल्याची घोषणा केली. हरियाणात चित्रपटाचा धुमधडाक्यात मुहूर्तही पार पडला. पण चित्रपट पूर्ण करण्यात त्यांच्या वाट्याला अपयश आलं.

अलिकडे एएनआयशी दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी या कटू आठवणीला उजाळा दिला. 'शिखर या चित्रपटाची पार्श्वभूमी युद्धाची होती. आम्ही चित्रपटाचा मुहूर्तही केला होता आणि काही गाण्यांचेही रेकॉर्डिंग तयार होते. मात्र त्रिमुर्ती या चित्रपटाला अपयश आल्यामुळे आमचे बजेट कोलमडले. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट बासनात गुंडाळावा लागला. त्याऐवजी आम्ही एक कमी बजोटचा चित्रपट बनवायचा निर्णय घेतला आणि अकेरी परदेस चित्रपटाची निर्मिती केली.', असे सुभाष घई शिखर चित्रपटाची आठवण सांगताना म्हणाले.

शिखर चित्रपट गुंडाळावा लागल्यामुळं शाहरुखच्या चाहत्यांना सुभाष घईनं निराश केलं. मात्र याची कसर त्यांनी १९९७ मध्ये भरुन काढली आणि परदेस चित्रपट शाहरुख खानला घेऊन बनवला. या चित्रपटातनं महिमा चौधरीने अभिनयात पदार्पण केलं होतं.

परदेस हा चित्रपट भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील नितीमुल्यांच्या बोवती फिरणारं कथानक असलेला चित्रपट होता. या ब्लॉकबस्टर चित्रपटात शाहरुखनेनायकाची मुख्य भूमिका साकारली होती. यात महिमा चौधरीने त्याचा प्रेमीकांची सुंदर भूमिका साकारली होती. हा चित्रपट हिट ठरण्यामध्ये 'ये दिल दीवाना' आणि 'मेरी मेहबूबा' या गाण्यांचे मोठे योगदान होतं. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या सिनेमाचे संगीत लॉन्च केलं होतं. परदेस चित्रपट प्रदर्शित होऊन आता २५ वर्ष उलटली आहेत. तरी आजही या चित्रपटातील गाणी लोकांच्या ओठावर ताजी आहेत.

हेही वाचा -

१. Sonu Sood wraps up Fateh : सोनू सूदने पूर्ण केले सॅन फ्रॅन्सिकोतील फतेहचे शुटिंग

२. Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23 : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घट...

३. Hrithik Roshan and Saba Azad: सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझाद झाले ट्रोल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.