हैद्राबाद : 'माय लाइफ मी' या गाण्याद्वारे पदार्पण करणारी के-पॉप गायक हसूने आत्महत्या केली आहे. हसू फक्त 29 वर्षांची होती. तिचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना हॉटेलच्या खोलीतून एक सुसाइड नोट मिळाली आहे. हसूचा जन्म 1993 मध्ये झाला आणि हसूने 2019 मध्ये गाण्यच्या क्षेत्रात आली तिने सोलो गाणे 'माय लाइफ मी' या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. गायो स्टेज, हँगआउट विथ यू आणि द ट्रॉट सारख्या शोमध्ये काम करून तिला प्रसिद्ध मिळाली होती. तिच्या गायनने तिने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. सोशल मीडियावर तिचे चाहते या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
ग्वांगजुमियोन पीपल्स डे कार्यक्रमात करणार होती परफॉर्म : हसूचे अनेक आकर्षक गाणी गायली आहे. जी आजही फार लोकप्रिय आहे, शिवाय तिची गाणी तिच्या चाहत्यांना फार आवडतात. मिळालेल्या माहितीनुसार, ती 20 मे रोजी जिओलाबुक-डोच्या वांजू गनमधील ग्वांगजुमियोन पीपल्स डे कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. पॉप ग्रुप हाताळणाऱ्या एजन्सीने तिच्या मृत्यूशी पुष्टी करणारे एक विधान जारी केले आहे, आणि लोकांना या दुःखद घटनेमागील कारणाबद्दल अनुमान करणे थांबवण्याचे आवाहन केले.
चाहत्यांनी केले दु;ख व्यक्त : एजन्सीने एक निवेदन जारी केले की, 'आम्ही दुःखद आणि हृदयद्रावक बातमीबद्दल माफी मागू इच्छितो. त्यानंतर त्यांनी सांगितले की, दक्षिण कोरियाच्या बॉय बँड ASTRO शी संबंधित असणारा -पॉप स्टार मूनबिनचे वयाच्या 25 व्या वर्षी 19 एप्रिल 2023 रोजी आत्महत्या केली होती. हे दुःख खूप मोठे आहे. त्याला गमावल्याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. हसूचे चाहते सोशल मीडियावर दु;ख व्यक्त करत कमेंटद्वारे आपल्या भावना व्यक्त करत लिहत आहे की, कुटुंब आणि मित्रपरिवाराला झालेल्या या सर्वांप्रती माझ्या संवेदना. मला आशा आहे की, तुझ्या आत्म्याला शांती मिळाली असेल. एका चाहत्याने मानसिक आरोग्याचे महत्त्वही अधोरेखित केले तर दुसऱ्याने लिहिले, दुर्दैवाने अशा नेहमीचं घटना घडत आहे. आजकाल मानसिक आरोग्य ही एक मोठी महामारी आहे. हे खूप दुःखद आहे. RIP HAESOO, मला आशा आहे की तुम्हाला आता अधिक शांतता मिळेल. कुटुंब आणि मित्रपरिवाराला चाहत्यांनी धीर दिला आहे.
हेही वाचा : Amitabhs journey on a bike : ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अमिताभ यांनी चक्क बाईकवरुन गाठला स्टुडिओ