मुंबई : हरिहरन अनंत सुब्रमणी (जन्म 3 एप्रिल 1955) हे एक भारतीय पार्श्वगायक, भजन आणि गझल गायक आहे, जे प्रामुख्याने तमिळ, हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये गातो. त्यांनी मल्याळम, कन्नड, मराठी, सिंहला आणि भोजपुरीसह 10 प्रादेशिक भाषांमध्ये 15,000 हून अधिक उल्लेखनीय गाणी गायली आहेत. ते एक प्रस्थापित गझल गायक आहेत आणि भारतीय फ्यूजन संगीताच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. 2004 मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले आणि ते दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत.
तबलावादक बिक्रम घोष : हे संगीत क्षेत्रामध्ये विविध प्रकार सादर करतात. निओ-फ्यूजन संगीत सादर करणाऱ्या रिदमस्केप या त्यांच्या दीर्घकालीन बँडने 2011 मध्ये त्यांचा 10 वा वर्धापन दिन साजरा केला. बँडने त्यांचा दुसरा अल्बम, ट्रान्सफॉर्मेशन देखील रिलीज केला, ज्याने इंडियन रेकॉर्डिंग आर्ट्स अवॉर्ड्स 2012 मध्ये सर्वोत्कृष्ट फ्यूजन अल्बम जिंकला. घोष आसामी लोक/इंडी गायक पापोन आणि स्कॉटिश गायक-गीतकार रेचेल सर्मान्नी यांच्यासमवेत ट्रॉयकलामध्ये परफॉर्म करतात.
मनमर्जी या अल्बमबद्दल गायक हरिहरन आणि तबलावादक बिक्रम घोष काय म्हणाले : आमच्या पाहिले गाणे कव्वाली रिलीज होणार अहे. हरिहरन यांनी कव्वाली कधीच गायली नसल्यामुले त्यांच्यासाठी ही कव्वाली आहे. सगळ्या गाण्यांच्या ताज्या रचना अहेत. हरिहरन यांच्या आवाजाने चार चांद लावले आहेत. हा आमचा सोबत केलेला दुसरा अल्बम आहे. पहिला आमचा इश्क हा अल्बम होता आणि मनमर्जी हा दुसरा अल्बम आहे. आम्हाला फीडबॅक खूप चांगला मिळाला अहे. लोकांना हा अल्बम खूप अवडतोय.
यापूर्वी इश्क हा अल्बम एकत्र केला होता. त्तर दोन्ही अल्बमचा अनुभव कसा होता? : हरिहरन म्हणाले, इश्क या अल्बममध्ये सगळे गाणे होते. आणि मनमर्जी या अल्बममध्ये उर्दू आणि बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहे. या अल्बममध्ये सगळे लव्ह साॅंग्स देखील अहे.
रेकॉर्डिंगच्या वेळेचा एखादा मजेदार किस्सा : हरिहरन यांच्या डोक्यात भरपूर विचार असतात. त्यांचा आवाज आणि त्यांच्यातले कौशल्य कहीही करू शकतात. हरिहरन एखादे गाणे गातात तेव्हा त्यांचे प्रत्येक टेक वेगवेगळे असतात. ते मला कही कल्पना आणि इम्प्रुवायझेशन देतात आणि ते खूप मजेदार असते. त्यानुसार मी व्यवस्था करतो.
हरिहरनजी जेव्हा तुम्हाला तुमचे गुरू, ज्येष्ठ गायक मेहदी हसनजी यांना भेटायचे होते. तेव्हा तुम्ही त्यांना भेटण्याबाबत खोटे बोललात. तुम्ही इंडियन एक्सप्रेसमधून आल्याचे सांगितले होते. आम्हाला तो किस्सा ऐकायला आवडेल : 1975 मध्ये जेव्हा मेहदी खान साहब पहिल्यांदा आले होते. ते एकून मी खूप उत्साहित झालो होतो. मला त्यांना काहीही करून भेटायचे होते. कारण बऱ्याच वर्षापासून त्यानंना ऐकत होतो. पण कधी बघितले नव्हते. मी त्यावेळेस लॉ कॉलेजला होतो. माझ्याकडे एक बॅग होती. त्यात काही पुस्तके होती. तेव्हा एक पत्रकार असल्यासारखे माझे व्यक्तिमत्व होते. मी त्यांना भेटायला गेलो. तिथे सगळे चित्रपट उद्योगामधले लोक बसले होते. मी रिसेप्शनच्या जवळ गेलो आणि संगितले की मी रिपोर्टर आहे आणि मी इंडियन एक्सप्रेस कडून आलोय. माला त्यांची मुलाखत घ्यायची आहे. मग ते बाहेर आले आणि मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. अशी माझी पाहिली भेट होती.
व्हॅलेंटाईन डे ला मनमर्जी हा अल्बम रिलीज होणार आहे. हरिहरन यांनी यात पाच गाणी गायली आहेत आणि बिक्रम यांनी संगीत दिले आहे. कसा आहे अनुभव होता ? : बिक्रम घोष अल्बम मनमर्जीवर बालताना म्हणाले, संगीतबद्ध केलेल्या या भव्य अल्बममध्ये सुंदर पाच गाणी आहेत. प्रत्येक गाणी मधुर आणि सौम्य आहे. साउंडस्केप उत्कृष्ट श्रेणीचे आहे आणि त्यात पूर्व आणि पाश्चात्य स्ट्रेन आणि वाद्ये एक रोमांचक मिश्रणात वापरले गेले आहे. या अल्बममध्ये राजीव पांडे आणि सुतापा बसू यांचे सुंदर बोल आहेत. पाच भव्य व्हिडिओ गाणी योग्यरित्या संगीतबद्ध करण्यात आले. यामध्ये कव्वाली शैलीतील गाणे नशा तेरी बाली हे फिल्मी कव्वालीच्या शैलीतील रोमँटिक गाणे आहे. दुसरे अजनबी गाणे आहे. या अल्बममध्ये गीत, गझल, कव्वाली आहे. अजनबी ही हरिहरंजींनी अप्रतिम अंतरंगात गायले आहे. यातले सुतापा बुसूचे बोल आपल्याला पुन्हा प्रेमात पाडतात. असे अनोखे गीत या अल्बममध्ये आहे. पं. बिक्रम घोष म्हणाले, मॅक्स्ट्रो हरिहरनसोबत पुन्हा काम करताना माझा सन्मान होत आहे. पद्मश्री हरिहरन म्हणाले, इश्क मे आला या गाण्यात शरीर आणि मनाला भुरळ घालणारी तरुण प्रेमाची मादकता गायकीतून व्यक्त होते. त्यातले दरिया हे एक उत्कृष्ट रॉक-सूफी गाणे आहे. हुस्न हे गाणे स्लो बर्न जॅझ-शैलीतील रचना आहे. घोष हे राग आणि वादनाच्या माध्यमातून संवेदनांचे विश्व निर्माण करतात. हे गाणे स्त्रीच्या सौंदर्याचा बोध आहे.