ETV Bharat / entertainment

Shanaya Kapoor : शनाया कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून करणार फिल्मी करिअरची सुरुवात - बॉलीवुड अभिनेता संजय कपूरची मुलगी

संजय कपूरची मुलगी आणि अनिल कपूरची भाची शनाया कपूर बॉलिवूडमधून नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे.

Shanaya Kapoor
शनाया कपूर
author img

By

Published : Jul 6, 2023, 3:40 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी आणि अनिल कपूरची भाची शनाया कपूरबद्दल बी-टाऊनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शनाया कपूर तिच्या सौंदर्यामुळे फार चर्चेत असते. इतकेच नाही तर शनाया सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. शनायाच्या फ्रेंड लिस्टमध्ये सुहान खान आणि अनन्या पांडे आहे. या नेहमी पार्टी करताना अनेक वेळा दिसतात. पार्टीचे अनेक फोटो या तिघी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकत असतात. या तिघी मिळून सोशल मीडियावर खळबळ उडवून देतात.

शनायाबद्दल बोलले जात आहे : अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे आणि सुहाना 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, परंतु शनाया अद्याप चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. शनाया बेधडक या बॉलिवूड चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती, मात्र आता सध्याला एक वेगळीच बातमी ऐकण्यात येत आहे, शनायाबद्दल बोलले जात आहे की ती बॉलिवूडमधून नाही तर साऊथ चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून करणार पदार्पण : शनाया कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार मोहनलालच्या आगामी 'व्रुशभा' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर 'व्रुशभा' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे, ज्याची निर्मिती कन्नड चित्रपट दिग्दर्शक नंदा किशोर करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाची कहाणी वडील आणि त्याच्या मुलाभोवती फिरणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शनायाची दमदार भूमिका सांगितली जात आहे.

हा चित्रपट देशभरात होणार प्रदर्शित : या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर विजेते चित्रपट आरआरआर दिग्दर्शक एस. एस राजामौली यांच्या मगधीरा चित्रपटासारखेच असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये शूट केला जाणार आहे. तसेच हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रोशन मेका, गरूणा राम, सिमरन आणि श्रीकांत हे देखील कलाकार रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे. एकता कपूर कनेक्ट मीडिया आणि एवीएस (AVS) स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाची शुटिंग ही जुलैच्या अखेरीस सुरू होणार आहे.

हेही वाचा :

  1. CoCo Lee passes away : निराशेच्या गर्तेत गायिका कोको लीने केली आत्महत्या, संगीत जगतात शोककळा
  2. Ranveer Singh birthday : रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्य दीपिकाने शेअर केला क्रिस्पी केक, करण जोहरनेही दिल्या शुभेच्छा
  3. SPKK box office collection day 7 : 'सत्यप्रेम की कथा'ने 50 कोटींचा आकडा पार केला, एका क्लिकवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन पहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.