मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन जोरदार कमावले तर आहेच पण चाहत्यांना भुरळ देखील घातली आहे. आलिया भट्टसह चित्रपट सृष्टीतील अनेक स्टार्सही अॅक्शन फिल्म पठाण पाहत आहेत. दरम्यान, शनिवारी चित्रपट पाहिल्यानंतर शाहरुखने त्याचा लहान मुलगा अबरामची प्रतिक्रिया उघड केली आहे.
-
I don’t know how but he said papa it’s all Karma. So I believe it. https://t.co/kIG6InIpGa
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I don’t know how but he said papa it’s all Karma. So I believe it. https://t.co/kIG6InIpGa
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023I don’t know how but he said papa it’s all Karma. So I believe it. https://t.co/kIG6InIpGa
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023
अबरामची प्रतिक्रिया : ट्विटरवर आस्क एसआरके सत्रादरम्यान एका यूजरने शाहरुख खानला विचारले की, 'पठानला पाहिल्यानंतर अबरामची प्रतिक्रिया काय होती? शाहरुखने उत्तर दिले, 'मला कसे माहित नाही, पण अबराम म्हणाला की हे सर्व कर्म आहे... त्यामुळे माझा त्यावर विश्वास आहे. शाहरुख खान स्टारर 'पठाण' मधील 'बेशरम रंग' हे गाणे रिलिझ झाल्यापासून चित्रपट वादात सापडला होता. दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगामुळे देशभरात निषेध व्यक्त केला गेला.
अॅक्शन चित्रपट : भगवे आणि हिरव्या रंगाचे कपडे वापरल्यामुळे काहींना गाणे आक्षेपार्ह वाटले. देशाच्या अनेक भागात अनेक कार्यकर्त्यांनी निदर्शने करत दीपिका आणि शाहरुखचे पुतळे जाळले. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित, 'पठाण' चित्रपट प्रजासत्ताक दिन 2023 च्या एक दिवस आधी 25 जानेवारी रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे. हा एक अॅक्शन चित्रपट आहे.
जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई : सध्या पठाण चित्रपटाने जगभरात 300 कोटींहून अधिक कमाईचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, शाहरूख खानकडे हातात सध्या आणखी दोन चित्रपट आहेत. राजकुमार हिरानीचा 'डांकी' चित्रपट आणि दक्षिणेतील दिग्दर्शक अॅटलीचा 'जवान' चित्रपट सध्या आहेत. जवानमध्ये तो नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे तापसी पन्नू शाहरूखसोबत डंकीमध्ये दिसणार आहे.
गौरी खान भावूक : पठाण चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) ७० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्याने अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. 'पठाण'चे यश हा चित्रपट नसून, शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रवास ठरला आहे. दुसरीकडे, गौरी खानने हा चित्रपट पाहिल्यावर ती भावूक झाली. गौरी खानच्या डोळ्यांत पाणी आले. कारण गेल्या चार वर्षांत पठाणवर शाहरुख खानने मोठा घाम गाळला होता. हे गौरी आणि तिच्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.