ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan and salman khan : 'टायगर ३' मधील शाहरुखचा लूक, 'या दिवशी' होऊ शकतो प्रदर्शित !! - सलमान खान टायगर ३

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर चित्रपट 'टायगर ३' मधील शाहरुख खानचा फर्स्ट लूक या खास दिवशी लॉन्च होऊ शकतो. पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटनंतर पुन्हा एकदा शाहरुख आणि सलमान खान टायगर ३मध्ये एकत्र दिसणार आहेत.

Shah Rukh Khan and salman khan
शाहरुख खान आणि सलमान खान
author img

By

Published : Jul 24, 2023, 5:16 PM IST

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा त्याच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. 'टायगर ३' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता सलमान खानच्या ' टायगर ३' चित्रपटामध्ये शाहरुख खान हा कॅमिओद्वारे प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि सलमान खानची जोडी ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणमध्ये दिसली होती. आता पुन्हा एकदा आपल्याला ही जोडी एकत्र दिसणार आहे. पठाण या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. पठाण चित्रपटामधील सलमान खानच्या कॅमिओने चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली होती. शाहरुख आणि सलमान खानला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. टायगर हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

'जवान'सोबत 'टायगर 3' चा टीझर रिलीज होणार : शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'जवान'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या 'टायगर ३' चित्रपटाचा टीझर 'जवान' सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार, असल्याचे बोलले जात आहे. आता शाहरुखसोबतच सलमान खानचे चाहतेही 'जवान' चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर कमाई करेल असा अंदाज वर्तविला जात आहे, कारण या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षकाद्वारे खूप पसंत केले गेले होते.

टायगर ३ मधील शाहरुख खानचा पहिला लूक कधी समोर येईल? : सलमान खान स्टारर चित्रपट 'टायगर ३' १० नोव्हेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'टायगर ३' मधील शाहरुख खानचा फर्स्ट लूक किंग खानच्या वाढदिवशी समोर येणार आहे, मात्र याबाबत निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. 'टायगर ३' चे दिग्दर्शन मनीष शर्मा ​​यांनी केले आहे. यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'टायगर ३' या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. RRKPK: रणवीर सिंग आणि आलिया भट्ट कोलकत्याला रवाना, 'धिंडोरा बाजे रे' गाणे करणार लॉन्च
  2. Deepika Padukone : दीपिका पदुकोण विमानतळावर अवतरली पण एअरपोर्ट लूकमुळे झाली ट्रोल
  3. Vijay Sethupathi's first look: 'किंग खान'ची होणार 'डिलर ऑफ डेथ'शी टक्कर, 'जवान'मधील विजय सेतुपतीचे पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.