ETV Bharat / entertainment

SRK Diwali celebration with KJo : शाहरुख आणि करण जोहरचे अलिबागमध्ये दिवाळी सेलेब्रिशन, लीक फोटोमुळे सोशल मीडियावर वादळ - शाहरुख आणि गौरी खान

SRK Diwali celebration with KJo : शाहरुख खाननं जवळचा मित्र करण जोहर आणि त्याच्या पत्नी व मुलांसोबत अलिबागमध्ये दिवाळी साजरी केली. करण आणि शाहरुखच्या या सेलेब्रिशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

SRK Diwali celebration with KJo
शाहरुख आणि करण जोहरचे दिवाळी सेलेब्रिशन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 5:07 PM IST

मुंबई - SRK Diwali celebration with KJo : सुपरस्टार शाहरुख खाननं कुटुंबीय आणि करण जोहरसारख्या मित्रांसोबत सेलेब्रिट केलेल्या दिवाळी सणाच्या फोटोंनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केलंय. किंग खाननं त्याची पत्नी गौरी खान आणि मुलं सुहाना, आर्यन आणि अबराम यांच्यासह मुंबईच्या गर्दीपासून दूर जात दिवाळीसाठी निवांत आणि शांत जागा निवडली. अनेक स्टारस्टडेड दिवाळी पार्टयामध्ये उपस्थिती लावल्यानंतर करण जोहरनंही अलिबाग गाठलं आणि मित्र शाहरुख खानच्या दिवाळी सेलेब्रिशनमध्ये भाग घेतला.

लीक झालेल्या फोटोंमध्ये शाहरुख आणि गौरी खान समुद्रकिनारी बीचवर बाइक्सचा आनंद लुटताना दिसताहेत. मुंबईबाहेरील या शांत समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी सणाचा आनंद मनमुराद लुटला. शाहरुखनं कॅपसह लांब हेअर स्टाईल केल्यानं तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

करण जोहरने फेरीवर काढलेला सेल्फी शेअर करून दिवाळीसाठी मुंबई बाहेर आल्याचं दाखवून दिलं. अलिबागमधील कुटुंबांसोबतचा हा दिवाळीतील स्नेह सोहळा पुन्हा एकदा शाहरुख आणि यांच्यातील घट्ट नात्याचं दर्शन घडवताना दिसला. त्याचं नात व्यवसायाच्या पलिकडंचं असल्याचं यावरुन दिसतं.

शाहरुखनं काही दिवसापूर्वी सलमानची बहिण अर्पिता खाननं आयोजित केलेल्या दिवाळी सेलेब्रिशन पार्टीला हजेरी लावली होती. अलिकडेच त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला होता. हजारो चाहत्यांचा गरा त्याच्या घराभोवती पडला होता. त्यानंतर फॅन क्लबनं आयोजित केलेल्या पार्टीलाही त्यांनं हजेरी लावली होती. आता गजबजलेल्या शहरातील या घडामोडीनंतर त्यानं दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी अलिबागचा सुंदर किनारा गाठलाय. शाहरुख बऱ्याचदा या ठिकाणी येऊन राहात असतो.

सलमान खानच्या 'टायगर 3' मध्ये शाहरुखनं कॅमिओ रोल केला होता. या चित्रपटाला चांगलं यश मिळालंय. त्यामुळे दिवाळी सेलेब्रिशनासाठी हे आणखी एक कारण त्याच्याकडे आहे. किंग खानचा आगामी 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाकडून त्याच्यासह चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. ख्रिसमसला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाशी टक्कर होणार आहे.

हेही वाचा -

  1. Nana Patekar Slaps Fan : नाना पाटेकरनं चाहत्याच्या कानाखाली वाजवली, व्हिडिओ व्हायरल

2. Ind Vs Nz Semifinal : रजनीकांत ते बिग बी; भारत न्युझीलंड उपांत्य सामन्याला 'हे' दिग्गज सेलिब्रिटी सामन्याला लावणार हजेरी

3. World cup 2023: भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानावर झळकणार रजनीकांत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.