मुंबई : एटली कुमार दिग्दर्शित शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. नयनतारा, विजय सेतुपती स्टारर हा चित्रपट यापूर्वी 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु चित्रपटाच्या पोस्ट - प्रॉडक्शनमध्ये होणारा विलंब लक्षात घेता जवानला आता नवीन रिलीज डेट मिळाली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नवीन टीझरसह चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट आता 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी चित्रपटाची नवीन रिलीज डेट नक्कीच एक आनंदाची बातमी आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शाहरुख खानने टीझर रिलीज केला : रेड चिलीजसोबतच शाहरुख खाननेही चित्रपटाची रिलीज डेट आणि टीझर रिलीज केला आहे. किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले '7 सप्टेंबर 2023, जवान रिलीज डेट'. साऊथचे दिग्दर्शक एटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथची सुंदर अभिनेत्री नयनतारा आणि सुपरस्टार विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर अभिनेत्री सान्या मल्होत्रा शाहरुख खानसोबत जवानचा भाग बनणार की नाही, अशा बातम्या येत होत्या. आता तिने देखील चित्रपटाची रिलिज डेट पोस्ट करत सर्व चर्चांना विराम दिला आहे. शाहरुखच्या पठाणने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडल्यानंतर आता प्रेक्षक त्याचा आगामी 'जवान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पठाणसह शाहरुखचे 4 वर्षांनी पुनरागमन : शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, या शाहरुखने पठाण चित्रपटासह तब्बल 4 वर्षांनी पुनरागमन केले. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच वर्चस्व गाजवले होते. पठाणमध्ये शाहरुख सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. जवानाशिवाय शाहरुखकडे राजकुमार हिरानीचा 'डंकी' हा चित्रपटही आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.