ETV Bharat / entertainment

SPKK box office collection day 8 : रिलीजच्या 8व्या दिवशी 'सत्यप्रेम की कथा'च्या कमाईत घसरण... - 50 कोटींचा टप्पा पार

'सत्यप्रेम की कथा'ने पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींचा आकडा गाठला आहे. आता दुसरा वीकेंड चित्रपटासाठी खूप खास असणार आहे. कार्तिक आर्यन आणि कियाराचा चित्रपट हिट की फ्लॉप, हे या वीकेंडलाच ठरणार आहे. सध्या चित्रपटाच्या 8व्या दिवसाचा कलेक्शन रिपोर्ट आला आहे, तर बघूया रिलीजच्या 8व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली तर.

SPKK box office collection day 8
सत्यप्रेम की कथा डे ८
author img

By

Published : Jul 7, 2023, 11:07 AM IST

मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट जवळपास 60 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. जिथे पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 50.61 कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, आता कार्तिक-कियारा यांच्या नवीन चित्रपटाच्या आठव्या दिवसाचा कलेक्शन रिपोर्ट समोर आला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशीही चित्रपटाचा वेग मंदावला आहे.

कमाईत घसरण : रिलीजच्या पाचव्या दिवसापासून 'सत्यप्रेम की कथा'च्या कलेक्शनचा आलेख सातत्याने घसरत आहे. सोमवारी या चित्रपटाने 4 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर मंगळवारी आणि बुधवारी चित्रपटाने 3.75 कोटी आणि 4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशाप्रकारे, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर एकूण 50.21 कोटींचा गल्ला जमला आहे. आता, दुसऱ्या वीकेंडच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या 8 व्या दिवशी, चित्रपटाने सुमारे 3.4 कोटींचा व्यवसाय केला आहे, .यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 54.11 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर कार्तिक आर्यनने चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. गुरुवारी, त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, या पोस्टमध्ये त्याचे हात जोडलेले आणि पांढरा हार्टचा इमोजीने त्याने पोस्ट केली आहे.

चित्रपटाचे गाणे झाले हिट : या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले असून साजिद नाडियादवाला आणि ग्रॅंडसन एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'सत्य प्रेम की कथा'मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, गजराज राव, सुप्रिया पाठक आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाचे रिव्हयू प्रेक्षकांनी ट्विटर चांगले दिले होते. याशिवाय बाकी एंटरटेनमेंट साईटवर या चित्रपटाला ४.५ स्टार देण्यात आले होते. या चित्रपटाचे गाणे फार जास्त प्रेक्षकांना पसंतीला पडले आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक चित्रपट गाणे बघण्यासाठी जात आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटीच्या कल्बमध्ये जाणार अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Sushmita Sen : सुष्मिता सेनने आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर केला डान्स...
  2. Angira Dhar IMDb Breakout Star : अंगिरा धरला बनली वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार, आयएमडीबीची घोषणा
  3. 'It's Rocky Day : रणवीर सिंगच्या वाढदिवशी दिग्दर्शकने शेअर केले 'रॉकी रानी की प्रेम कहानी'तील सर्वोत्कृष्ट फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.