मुंबई: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या ५ दिवसात चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ४२.७१ कोटींची कमाई केली. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे. चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सर्वात कमी कमाई केली आहे.
भारतात २००० स्क्रीन्सवर प्रदर्शित चित्रपट : 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या सहाव्या दिवशी काही खास कामगिरी करू शकला नाही आणि या चित्रपटाने जवळपास ३.७५ कोटी रुपयाची कमाई केली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. सहाव्या दिवशी 'सत्यप्रेम की कथा'ने एकूण ४६.४६ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट भारतात २००० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९.५ कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे, शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने ७ कोटींची कमाई केली होती. तर, शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने पुन्हा वेग घेतला आणि दुहेरी आकडा गाठला.
चित्रपटाची कमाई : रिलीजच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने अनुक्रमे १०.१ कोटी आणि १२.१५ कोटी रुपयांची कमाई केली, त्यानंतर चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ३८.५ कोटींवर पोहोचले. दरम्यान सोमवारी पुन्हा एकदा चित्रपटाचा वेग मंदावला. पाचव्या दिवशी चित्रपटाने केवळ ४.२५ कोटींची कमाई केली, त्यानंतर चित्रपटाने ४० कोटीचा टप्पा पार केला. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर चांगल्या प्रतिक्रिया येत आहे. तसेच या चित्रपटामधील गाणे देखील फार हिट झाले आहे. या चित्रपटाने जर कमाईत थोडा वेग घेतला तर लवकरच हा चित्रपट १०० कोटीचा आकडा पार करू शकणार कारण जरी प्रेक्षक आता चित्रपट बघायला कमी जात आहे पण पुढील शनिवार रविवारी हा चित्रपट आणखी जास्त कमाई करू शकणार अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
- Akanksha Puri questions : सलमानच्या माफीनंतर आकांक्षा पुरीचा हल्ला बोल, म्हणते - तो भाग 'हॉटेस्ट लिप-किस' म्हणून का प्रमोट केला?
- DARA SINGH SON VINDU DARA SINGH : आदिपुरुषमधील हनुमानजींच्या पात्रावर दारा सिंहचा मुलगा संतापला
- Sitaras Times Square debut : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकली सितारा, आई वडिलांचा आनंद भिडला गगनाला