मुंबई : समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने १२ जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दोन आठवडे पूर्ण केले आहेत. हा चित्रपट १३ जुलै रोजी तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणार आहे. दरम्यान हा चित्रपट रूपेरी पडद्यावर २९ जून रोजी देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता नुकतेच 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटने १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आता या चित्रपटाच्या १४व्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारच कमी कमाई केली आहे. आता हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचा मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ रिलीज झाला आहे. त्यामुळे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट हा कमाईच्या बाबतीत मागे पडू लागला आहे, असे दिसून येत आहे.
14 व्या दिवसाची कमाई : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईमध्ये १४व्या दिवशी मोठी घसरण बघायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १४व्या दिवशी फक्त १.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. १४व्या दिवसाच्या कमाईसह, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे देशांतर्गत एकूण कलेक्शन ७१.४१ कोटी रुपये कमविले आहे. दरम्यान, या चित्रपटाने जगभरात १०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते फार खुश आहेत.
'सत्यप्रेम की कथा' गुडघे टेकले : दरम्यान १४व्या दिवशी म्हणजे १२ जुलै रोजी, 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या कमाईत घट होण्याचे कारण म्हणजे हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचा मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ आहे. हा चित्रपट रिलीज झाला त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'सत्यप्रेम की कथा'च्या कमाईत फार घट होत आहे. टॉम क्रूझच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरपूर कमाई केली आहे. हा चित्रपट येणाऱ्या दिवसात फार कमाई करेल असे सध्या दिसत आहे.
हेही वाचा :