ETV Bharat / entertainment

Sara ali khan watched movie : साराने कुटुंबासह पाहिला 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट - सारा अली खानने कुटुंबासह चित्रपट पाहिला

साराने 'जरा हटके जरा बचके' तिचा चित्रपट कुटुंबासह पाहिला. त्यानंतर तिने चित्रपट पाहतानाचे फोटो हे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केली आहे.

Sara ali khan
सारा अली खान
author img

By

Published : Jun 5, 2023, 11:30 AM IST

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटणारी अभिनेत्री सारा अली खानने तिच्या कुटुंबासह आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिमसह हा चित्रपट पाहिला. साराने रविवारी इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपट पाहतानाचे कोलाज फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये ती आई आणि भावासोबत पोझ देताना दिसत आहे. तसेच तिच्या बाजूला बसून तिचे चाहते दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, 'रविवारचा दिवस सहपरिवारसह सिनेमा पाहताना घालवला'. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित असून या चित्रपटाचा सेट हा इंदोरमध्ये आहे. या चित्रपटाची कहाणी ही एका मध्यमवर्गीय जोडप्याभोवती फिरणारी आहे.

जरा हटके जरा बचके हा चित्रपट मनोरंजक : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटची सुरुवात ही कॉमेडीने सुरू होते. या चित्रपटात सारा (सौम्या) विक्की (कपिल) दोघे संयुक्त कुटुंबात राहत असतात त्यांना स्वता;चे घर हे सरकारी योजनामधून पाहिजे असते. त्यामुळे दोघे खोट्या घटस्फोटाचे नाटक करत असतात. या घटस्फोटासाठी दोघे फार नाटक करत असतात. या चित्रपटाची कहाणी फार मजेशीर आहे. त्यामुळे हा चित्रपट सहकुटुंब तुम्ही पाहू शकतात. विक्की आणि साराची अ‍ॅक्टिंग या चित्रपटात फार अप्रतिम आहे. विक्की आणि साराच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस डे 2 चा रिपोर्ट कार्ड आला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 1 आणि 2 व्या दिवशी एकूण 12.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहले, 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने प्रदर्शकांसाठी दिलासा दिला आहे.

चित्रपटाने 2 दिवसात केली भरभक्कम कमाई : शिवाय त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले की, हा चित्रपट हाऊसफुल आहे, आणि या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी वाढीचे साक्षीदार आहेत. वीकेंडमध्ये या चित्रपटाने 22 कोटी तसेच शुक्रवारी 5.49 कोटी, शनि 7.20 कोटी. एकूण: रु. 12.69 कोटी. इतक्याची कमाई केली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना विकी कौशलने म्हटले, लक्ष्मण सर आणि मॅडॉक यांच्यासोबत काम करणे हा एक आनंददायी अनुभव होता. मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी, विशेषत: सारासोबत खूप छान वेळ मिळाला आणि आशा आहे की प्रेक्षकांनाही आमच्याप्रमाणेच चित्रपटाचा आनंद मिळेल.' त्यानंतर साराने तिच्या पोस्टमध्ये लिहले, अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. या चित्रपटात नातेसंबंध, विवाह यांवर एक अनोखा विचार आहे आणि प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा मी यासाठी फार उत्सुक आहे. तसेच या चित्रपटात राकेश बेदी आणि इनाममुलहक यांनीही काम केले आहे.

हेही वाचा :

  1. Ashok Saraf 76th birthday : मराठी नायकांचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा सुपरस्टार, अशोक सराफ यांचा 76वा वाढदिवस...
  2. Actress Sulochna Latkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  3. Actress Sulochna Latkar Funeral: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.