ETV Bharat / entertainment

संदीप रेड्डी वंगाने दिले 'अ‍ॅनिमल पार्क'च्या संभाव्य शुटिंग शेड्यूलचे संकेत - रणबीर कपूर स्टारर अ‍ॅनिमलचा फॉलोअप

Animal Park Sequel to Animal : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'चा फॉलोअप पाहण्यासाठी चित्रपट रसिक उत्सुक आहेत. 'अ‍ॅनिमल पार्क' असे शीर्षक असलेल्या चित्रपटाच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल याचाही खुलासा वंगा यांनी केला आहे.

Animal Park Sequel to Animal
अ‍ॅनिमल पार्कच्या शुटिंग शेड्यूलचे संकेत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 2:40 PM IST

मुंबई - Animal Park Sequel to Animal : 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा 'अ‍ॅनिमल पार्क' नावाच्या दुसऱ्या भागासाठी सज्ज झाले आहेत. 'अ‍ॅनिमल' जागतिक आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत असल्याने, चाहते सुखावले आहेत. अशातच या चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्यामुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'शी टक्कर झाली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चाहत्यांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला, त्याचे प्रत्यंतर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर सततच्या यशाने दिसून येत आहे. पहिल्या भागाच्या पोस्ट-क्रेडिट सीनशी संलग्न असलेल्या 'अ‍ॅनिमल पार्क'च्या टीझरने बरेच लोक उत्सुक झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याविषयी बोलताना दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी आगामी 'अ‍ॅनिमल पार्क'च्या शुटिंगबद्दलचा खुलासा केला. या चित्रपटाची पात्रे आणि अनुक्रमाबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितले.

चित्रपटाचा दुसरा भाग लिहावासा वाटतोय, असा खुलासा त्यांनी चर्चेदरम्यान केला. पहिला चित्रपटाचा अखेर असुरक्षित नोटवर संपल्याने त्यांना दुसरा भाग बनवण्याची इच्छा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटातील क्रेडिट्सनंतर कसाईचा सीन समाविष्ट करण्याचा निर्णय का घेतला यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

  • It's a partnership built on trust, fueled by creative freedom, and fortified by an unbreakable bond. Producer Bhushan Kumar and Director #SandeepReddyVanga unveil the next cinematic wonders—Prabhas' Spirit, Animal Park, and an Allu Arjun saga—the chapters that follow the… pic.twitter.com/kSAVQhICCW

    — T-Series (@TSeries) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रणबीरची व्यक्तिरेखा 60 वर्षांच्या व्यक्तीच्या रूपात चित्रपटाची सुरुवात का करते याबद्दल विचारले असता संदीप रेड्डी वंगा यांनी भाग 3 बद्दल एक प्रमुख स्कूप देखील उघड केला. त्याने ट्रायॉलॉजीच्या संभाव्यतेचा उल्लेख केला आणि रणबीरने भाग 2 आणि भाग 3 लक्षात ठेवून एक वृद्ध माणूस म्हणून चित्रपटाची सुरुवात केल्याचे सांगितले.

संदीप रेड्डी वंगा आता प्रभास अभिनीत 'स्पिरिट' या आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रित करणार आहेत. हा चित्रपट सप्टेंबर २०२४ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ते 'अ‍ॅनिमल पार्क' चित्रपटाचे काम सुरू करतील.

हेही वाचा -

  1. दुबईत 'डंकी'चं जोरदार प्रमोशन, ड्रोन शोमध्ये साकारली किंग खानची सिग्नेचर पोज
  2. 2023 मध्ये चंदेरी दुनियेत पदार्पण करणाऱ्या स्टार किड्स विषयी जाणून घ्या
  3. किंग खानची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; 'या' प्रकरणी होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.