मुंबई : देशातील सर्वात थंड राज्यांपैकी एक असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये सध्या निसर्गाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशात जाणे हे टाळले पाहिजे. सध्या हिमाचल प्रदेशात फार जास्त भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निसर्ग वेगवेळ्या पद्धतीने आपला कहर दाखवत आहे. निसर्गाच्या या कहरमध्ये फार नुकसान देखील होत आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पुरामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून अनेक स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या विध्वंसामुळे सध्या संपूर्ण देश चिंताग्रस्त आहे. हिमाचलच्या पांढऱ्या मैदानी शहर मनालीमध्ये मृत्यूचे तांडव आता देखील सुरू आहे. यादरम्यान आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनालीमध्ये उपस्थित असलेला अभिनेता रुसलान मुमताज याठिकाणी अडकला असून त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्याचे समजत आहे.
रुस्लान हा मनालीला का गेला होता? : रुस्लान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या फिल्म प्रोजेक्टसाठी याठिकाणी थांबला होता. या ठिकाणावरून त्याने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता सध्या रुस्लानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून मनालीतील पुरात अडकल्याचे सांगितले आहे. दरम्यान, त्याने पुरात वाहणारी कार देखील दाखवली आहे, परंतु त्याच्या रिसॉर्टच्या बाहेर वाहून जाणारी कार त्याची आहे की नाही याबद्दल पुष्टी अद्याप झालेली नाही. तसेच मनालीहून चंदीगडला येणारे मार्ग देखील पूर्णपणे बंद केले गेले आहेत.
रुस्लान म्हणाला आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाही : रुस्लानने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'पूर इतका गंभीर आहे की रस्तेही दिसत नाहीत, मनालीमध्ये अशा प्रकारे अडकून पडेन, असे मला कधीच वाटले नव्हते, इथे नेटवर्क नाही आणि घरी जाण्यासाठी रस्ताही नाही.', आता तर आमचे शूटिंग देखील रखडले आहे, या सुंदर शहरात इतका कठीण काळ आहे, काय करावे, दुःखी व्हावे, धन्यवाद म्हणावे, कृतज्ञता व्यक्त करावी की फक्त नशिबाचा आनंद घ्यावा हेच कळत नाही आहे, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :