ETV Bharat / entertainment

Ram Charan Upasana Child : लग्नानंतर ११ वर्षानंतर राम चरण-उपासनाला झाले कन्यारत्न.... - चिरंजीवी

राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांना कन्यारत्न झाले आहे. आज मंगळवार, २० जून रोजी उपासनाने एका गोडस बाळाला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे शेअर करण्यात आली आहे.

Ram Charan
राम चरण
author img

By

Published : Jun 20, 2023, 10:11 AM IST

हैदराबाद : आरआरआर फेम अभिनेता आणि साऊथ सुपरस्टार रामचरणच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. उपासनाने आज, मंगळवार, पहाटे २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर रामचरण आणि त्याची पत्नी उपासना आई-बाबा झाले आहेत. उपासनाला सोमवारी रात्री 19 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज तिने मंगवारी 20 जून रोजी एका गोडस बाळाला जन्म दिला आहे. उपासनाला हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अपोलो हॉस्टिपटमध्ये दाखल करण्यात आले होते. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे शेअर करण्यात आली आहे.

रामचरण आणि उपासना झाले आई- बाबा : रामचरण आणि उपासना सध्याला हैदराबादमध्ये राहत असून आता या जोडप्यासोबत बाळाची काळजी घेण्यासाठी चिरंजीवी आणि सुरेखा देखील राहणार आहे. रामचरण आणि उपासना आई बाबा झाल्याची आनंदाची बातमी ही वाऱ्यासारखी पसरत असून, चाहते या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मेगास्टार चिरंजीवी हे आजोबा झाले आहेत. त्यामुळे रामचरणच्या घरचे वातावरण सध्याला आनंदमय आहे. दरम्यान एका मुलाखतीत उपासनाने सांगितले होते की, अनेकजण बाळ झाल्यानंतर घराबाहेर पडतात. पण आम्ही याविरुद्ध करणार आहे. आतापर्यंत आम्ही दोघेच सोबत राहत होतो. पण आता बाळाचा जन्म झाल्यानंतर आम्ही रामचरणच्या कुटुंबीयांसोबत राहणार आहोत. बाळासाठी आजी-आजोबाचे प्रेम खूप महत्त्वाचे असते. हे मला आणि रामचरणला माहीत आहे. आमच्या बाळालाही आजी-आजोबाचे भरभरून प्रेम मिळावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.

लग्नाच्या 11 वर्षांनंतर कन्यारत्न प्राप्त : राम चरण आणि उपासना १४ जून २०१२ रोजी लग्नबंधनात अडकले होते. ५ दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या 11 वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. त्यामुळे हा आनंद खूप मोठा आहे. याशिवाय चाहतेही बाळाची एक झलक पाहण्यासाठी फार उत्सुक आहे. त्यामुळे सध्याला सोशल मीडियावरही चाहते आनंद व्यक्त करत आहे.

हेही वाचा :

  1. Kartik Aaryan admits :आपल्यावर मुले आणि मुलीही लाईन मारतात, कार्तिक आर्यनची कपिल शर्मा शोमध्ये कबुली
  2. Hrithik Roshan Hot Pic : हृतिक रोशनच्या शर्टलेस फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
  3. FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे नेमके प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.