ETV Bharat / entertainment

सलमान खान मराठीत झळकणार, रितेश देशमुखच्या ‘वेड’चे चित्रीकरण झाले पूर्ण! - Wade directed by Riteish Deshmukh

‘वेड’ या आगामी चित्रपटानिमित्ताने रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘दुहेरी’ भूमिकेत दिसणार आहे. ही अभिनयातील दुहेरी भूमिका नसून रितेश ‘वेड’ मध्ये अभिनयाबरोबरच त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. त्याचा हा पहिलाच प्रयत्न असून त्याची अर्धांगिनी जिनिलिया देशमुख या चित्रपटाद्वारे मराठीत अभिनय पदार्पण करीत आहे.

रितेश देशमुखच्या ‘वेड’चे चित्रीकरण झाले पूर्ण!

author img

By

Published : Jul 11, 2022, 3:58 PM IST

मुंबई - ‘लई भारी’ म्हणत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यानंतर त्याने ‘माउली’ या मराठी चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. आता ‘वेड’ या आगामी चित्रपटानिमित्ताने तो पुन्हा एकदा ‘दुहेरी’ भूमिकेत दिसणार आहे. ही अभिनयातील दुहेरी भूमिका नसून रितेश ‘वेड’ मध्ये अभिनयाबरोबरच त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. त्याचा हा पहिलाच प्रयत्न असून त्याची अर्धांगिनी जिनिलिया देशमुख या चित्रपटाद्वारे मराठीत अभिनय पदार्पण करीत आहे. रितेश चा ‘भाऊ’ म्हणजेच बॉलिवूडचा ‘भाईजान’, सलमान खान हा नेहमीच रितेश च्या मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक असतो. सलमान ने ‘लई भारी’ मध्ये ‘कॅमियो’ केला होता आणि रितेश देशमुख च्या दिग्दर्शनाखाली तो पुन्हा एकदा मराठी चित्रपटातून मराठी बोलताना दिसणार आहे.

रितेश देशमुखच्या ‘वेड’चे चित्रीकरण झाले पूर्ण!
रितेश देशमुखच्या ‘वेड’चे चित्रीकरण झाले पूर्ण!

सलमान खान ‘वेड’ मध्ये एका छोटुश्या पण गोड भूमिकेत दिसणार असून त्याने आपल्या भागाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले. रितेश आणि सलमान चा ‘भाईचारा’ सर्वश्रुत आहे आणि त्यांनी धमालमस्ती करीत शूट पूर्ण केले. किंबहुना ते शेवटचे शेड्युल होते आणि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्णपणे संपन्न झाले. त्यामुळेच या आषाढी एकादशी ला निर्माता-अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख ने ‘माउली’ चे आभार मानत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्याचे जाहीर केले. तसेच त्याने त्याचा ‘भाऊ’ सलमान चे सुद्धा आभार मानले.

मीरा राजपूतने शेअर केलेल्या 'नो फिल्टर' सेल्फीवर शाहिद कपूरची मजेशीर प्रतिक्रियारितेश देशमुख ने समाज माध्यमावर व्यक्त होत लिहिले, “आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ती म्हणजे ‘सलमान भाऊ’ ची. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे ‘वेड’ पूर्ण झाला आहे .आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच...”

हेही वाचा - मीरा राजपूतने शेअर केलेल्या 'नो फिल्टर' सेल्फीवर शाहिद कपूरची मजेशीर प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.