मुंबई - बॉलिवूडचे अतिशय क्यूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनिलियाला ओळखले जाते. दोघेही नेहमीच मजेशीर व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या कायम संपर्कात राहतात व मनोरंजनही करतात. आज जेनेलियाचा ३५ वा वाढदिवस साजरा होत असताना रितेशने एक मजेशीर रिल इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
या व्हिडिओत रितेश कॅमेऱ्याशी बोलत असून मागे जेनेलिया कोल्ड्रिंकचा आस्वाद घेताना दिसते. या रितेश हिंदीत म्हणतो की, ''आजकाल समोसा २० ला झालाय पण अजूनही या मुली १६ च्याच आहेत.'' यावर जेनेलिया त्याच्यावर भडकते आणि धक्का मारते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रितेशच्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून जेनेलियावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
दरम्यान, जेनेलियाने आणि रितेशने 2003 मधील ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. जेनेलियाने या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान रितेश आणि जेनेलियामध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तब्बल 10 वर्षांच्या डेटिंग नंतर 2012 साली रितेश आणि जेनेलियाने लग्नगाठ बांधली होती. त्यांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने झाले आहे. दोघांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव रायन आणि लहान मुलाचे नाव राहिल आहे. सध्या दोघेही अनेकदा मुलांसोबत मस्ती करताना दिसतात.
हेही वाचा - बर्थडे गर्ल काजोल आणि अजय देवगणची अजब लव्ह स्टोरी