ETV Bharat / entertainment

जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा आणि धनुष यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण - श्रीराम मंदिर

Ram Mandir Praan-Pratishtha Ceremony : श्रीराम मंदिर उद्घाटनाचा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यात अनेक नामवंत लोक येणार आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जॅकी श्रॉफ, धनुष, रणदीप हुडा यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

Ram Mandir Praan-Pratishtha Ceremony
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 12:23 PM IST

मुंबई - Ram Mandir Praan-Pratishtha Ceremony : अयोध्येत 22 जानेवारीला होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी देश विदेशातून दिग्गज पाहुण्यांना आमंत्रित केलं जात आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपींची नावं निमंत्रितांच्या यादीत सामील आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सिनेतारकांसह अनेक सेलिब्रिटींना एकामागून एक निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सना निमंत्रण दिल्यानंतर आता जॅकी श्रॉफ यांच्या कुटुंबीयांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आमंत्रित देण्यात आलं आहे.

श्रॉफ कुटुंबाला आमंत्रण : राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात टायगर श्रॉफही दिसू शकतो. सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ आणि त्याची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्याच्या आमंत्रणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोद्वारे त्यांनी स्वत:ला भाग्यवान मानले असून संस्थेचे आभार मानलं आहे. शेअर केलेल्या फोटोच्या पोस्टमध्ये जॅकीनं लिहिलं , ''आम्हाला 22 जानेवारीला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्याचा बहुमान मिळाला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीयांच्या जीवनातील हा ऐतिहासिक क्षण आहे. आजचा दिवस घडवून आणण्यासाठी अनेक दशकांपासून सहभागी झालेल्या आणि योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, आदरणीय आरएसएस मान्यवर, सुनील आंबेकरजी, अजय मुडपेजी आणि आमचे प्रिय मित्र महावीर जैन ज्यांनी आमच्या घरी भेट देऊन शुभ आमंत्रण दिलंय. जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफनेही तिच्या इन्स्टाग्रामवर आमंत्रणाची पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान या सोहळ्यात साऊथचा सुपरस्टार धनुष आणि नवविवाहित जोडपे रणदीप हुडा आणि लीन लैशराम यांना प्राण प्रतिष्ठाचे आमंत्रण मिळाले आहे.

'या' स्टार्सनाही आमंत्रण मिळाले आहे : याआधी बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले होते. दरम्यान कंगना रणौत, गायक सोनू निगमसह अनेक बॉलिवूड आणि साउथ सेलिब्रिटींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये विविध स्तरातील लोक यामध्ये काही खेळाडू, सैनिक, न्यायाधीश, उद्योजक, वैज्ञानिक, मीडिया हाऊसेस, कवी, लेखक, इतर साहित्यिक, इतिहासकार आणि हुतात्मांचे परिवार अशा अठरा प्रकारच्या कॅटेगरीतील व्यक्तीना निमंत्रीत केलं जाणार आहे. हा सोहळा भव्य असणार आहे.

  • Actor Randeep Hooda receives an invitation to attend the 'Pran Pratishtha' ceremony of Ram Temple on January 22nd in Ayodhya, Uttar Pradesh. pic.twitter.com/L81rmdEGtP

    — ANI (@ANI) January 8, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. 'सनफ्लॉवर 2'मध्ये सुनील ग्रोव्हरसोबत झळकणार 'द केरल स्टोरी' फेम अदा शर्मा
  2. बिग बॉसच्या घरात अभिषेक कुमारची रिएनट्री, कृतघ्न असल्याची स्पर्धकांकडून टीका
  3. 'सालार' सक्सेस पार्टीत प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत कापला केक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.