मुंबई - बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच आई-वडील झाले आहेत. ६ नोव्हेंबरला आलियाने एका छोट्या परीला जन्म दिला. मुलीच्या आगमनाने कपूर कुटुंबात आनंदाची लाट उसळली आहे. आता आलिया भट्टला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आलियाचा पती आणि अभिनेता रणबीर कपूर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नीला घरी घेऊन गेला आहे. घरी स्वागताची मोठी तयारीकरण्यात आली होती. या जोडप्याने अद्याप मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. हे जोडपे आपल्या परीचा चेहरा कधी दाखवणार याविषयी चाहते अस्वस्थ आहेत.
हॉस्पिटलमधून घरी परतत असताना आलिया आणि रणबीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आलियाच्या चेहऱ्यावर आई बनण्याची चमक स्पष्ट दिसत आहे. आलिया नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आलियाने दिली आनंदाची बातमी - आलिया भट्टने तिच्या पोस्टमध्ये मुलीच्या जन्माबद्दल चाहत्यांशी गुड न्यूज शेअर करताना लिहिले की, 'आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी म्हणजे आम्हाला बाळ झाले आहे... आणि ती एक जादुई मुलगी आहे'. या पोस्टसोबत आलियाने सिंहांच्या कुटुंबाचे स्केच देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये सिंह आपल्या सिंहिणी आणि मुलासोबत दिसत आहे. आलियाने जेव्हा तिच्या प्रेग्नेंसीची गुड न्यूज दिली होती, त्यावेळी तिने फक्त सिंह आणि सिंहिणीचा फोटो शेअर केला होता.
प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी यावर्षी 14 एप्रिल रोजी लग्न केले आणि त्यानंतर 27 जून रोजी प्रेग्नेंसीची घोषणा केली. त्याच वेळी, 6 नोव्हेंबरला आलियाने कपूर कुटुंबाला एक छोटी परी दिली.
हेही वाचा - 'उंचाई'च्या प्रीमियरमध्ये जया बच्चनने कंगना रणौतकडे केले दुर्लक्ष पाहा व्हिडिओ