ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं अभिनयाच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर.... - अभिनयाच्या जोरावर गाठले यशाचे शिखर

रणबीर कपूरचा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. रणबीरनं आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 1:34 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. रणबीर कपूरनं 2007 मध्ये संजय लीला भन्साळीच्या 'सावरिया' या चित्रपटातून पदार्पण केले होते. रणबीरचा पहिला चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप वाईटरित्या फ्लॉप झाला. 'सावरिया' चित्रपटाची ऑफर मिळण्यापूर्वी रणबीरनं भन्साळी यांना ब्लॅक चित्रपटासाठी असिस्ट केलं होतं. रणबीरनं आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यानं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रणबीरनं रॉकस्टार, ए दिल है मुश्किल , बर्फी, ये जवानी है दिवानी, तमाशा राजनीती, आणि ब्रह्मास्त्र यांसारखे हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहेत. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी...

बॉलिवूड इंडस्ट्रीत 17 वर्षे केली पूर्ण : रणबीरला फुटबॉल खेळायला खूप आवडतो. तो अनेकदा फुटबॉल खेळताना दिसतो. रणबीर कपूर देखील कपूर कुटुंबातील इतरांप्रमाणेच खाण्याचा शौकीन आहे आणि त्याचे आवडते पदार्थ भिंडीची भाजी, मटण कढी, सुशी आणि वडा पाव हे आहेत. एका रिपोर्टनुसार रणबीर कपूरची एकूण संपत्ती 345 कोटी रुपये आहे. रणबीर हा एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेत असतो. तो फक्त चित्रपटांतूनच नाही तर जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. रणबीर हा कोणत्याही ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे 6 कोटी रुपये घेत असतो. रणबीरला बॉलिवूड इंडस्ट्रीत 17 वर्षे झाली आहेत. रणबीर कपूरला चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. रणबीरनं अभ्यास टाळण्यासाठी अभिनय करण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत त्यानं याविषयी सांगताना म्हटलं होत की, 'मी अभिनेता होण्यामागच एकच कारण आहे ते म्हणजे मला अभ्यास करायला आवडत नव्हतं. आमच्या कुटुंबातील कोणाही अभ्यास केला नाही, सर्वांनाच अभिनेता व्हायचे होते. त्यानंतर रणबीरनं पुढं सांगितलं की, त्याचे आजोबा राज कपूर यांनी इतरांपेक्षा जास्त अभ्यास केला आहे.

अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूर : 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर दिसणार आहे. रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना हे देखील झळकणार आहेत. आता सध्या चित्रपटातील रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.

हेही वाचा :

  1. Animal teaser out : रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टिझर झाला प्रदर्शित...
  2. HBD Mouni Roy : दिशा पटानीनं बेस्ट फ्रेंड मौनी रॉयला दिल्या शुभेच्छा....
  3. Prabhas wax statue removed : बाहुबली फेम प्रभासचा पुतळा हटवणार, म्हैसूर संग्रहालयाने का घेतला निर्णय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.