ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant And Adil Khan : आईबाबत बोलणाऱ्या आदिल खान दुर्रानीवर राखी भडकली, म्हणाली... - पत्रकार परिषद

आदिल खान दुर्रानीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राखीबद्दल काही खुलासे केले आहेत. त्यानंतर राखीने देखील पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेत काय म्हटले राखी आणि आदिलने हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Rakhi Sawant And Adil Khan
राखी सावंत आणि राखी सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 11:29 AM IST

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा वादात सापडली आहे. पती आदिल खान दुर्रानीने तुरुंगातून बाहेर येताच पत्रकार परिषद घेऊन राखी सावंतवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान त्यानंतर राखीने देखील पत्रकार परिषद घेऊन आदिलवर जोरदार प्रहार केला. या पत्रकार परिषदेत राखीने आदिलला खुनी म्हटले आहे. एवढेच नाही तर तिने अनेक धक्कादायक खुलासे यावेळी केले आहेत. आदिल खान दुर्रानीने पत्रकार परिषदेत राखीवर करोडो रुपये खर्च केल्याचा दावा केला. याशिवाय आईच्या मृत्यूचा राखीवर काहीही परिणाम झाला नसल्याचे त्यांने सांगितले. राखीने त्याच्याविरोधात अनेक कट रचले होते आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप केला.

राखी सावंत केला गंभीर आरोप : राखी सावंतने पत्रकार परिषदेत म्हटले की, 'मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली नव्हती, तर त्याला मला मारायचे होते. आदिल हा खुनी आहे, ज्याने मुमताज नावाच्या महिलेच्या मुलाची कारने धडक देऊन हत्या केली होती. राखी इथेच थांबली नाही, तिने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले. राखी सावंतने दावा केला की, तिने आदिलला आक्षेपार्ह अवस्थे पकडले आहेत. मुलींव्यतिरिक्त आदिलचे पुरुषांशीही संबंध आहेत. राखीने पुढे म्हटले की, आदिलला पोलिसांनी पुराव्याच्या आधारे अटक केली आहे. कायदा कधीही चुकीचा असू शकत नाही. त्याने माझा गैरफायदा घेतला आहे. आदिलचे आरोप खोटे असल्याचे राखीने मीडियाला सांगितले.

आदिल यांनी हे आरोप केले : आदिल खान दुर्रानीने राखी सावंतवर आरोप केला होता की, लग्न झाल्यानंतरही तिने रितेशला घटस्फोट दिला नाही. उलट दोघेही एकमेकांशी बोलत असत. आदिलने पुढे सांगितले की, राखीच्या फोनवर रितेशचे मेसेज आणि कॉल्स आलेले त्याने पाहिले आहेत. तिला त्याने दुबईत पकडले होते. याशिवाय राखीने त्याची फसवणूक केली हे देखील आदिलने सांगितले.

राखी सावंतच्या वकीलने केला दावा : राखीच्या वकीलाने सांगितले की, आदिल खानवर म्हैसूरमध्ये १००हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. आदिलने बलात्काराव्यतिरिक्त फसवणूक देखील लोकांची केली आहे. आदिल खान हा पुन्हा एकदा तुरुंगात जाऊ शकतो, असे देखील त्यांनी सांगितले आहे.आता राखी सावंत आणि आदिलचा हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहावं लागेल.

हेही वाचा :

  1. 'चांद्रयान'वर मजेशीर पोस्ट करणे पडले महागात; 'या' अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल
  2. Gadar 2 Box Office Collection Day 12 : 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर पार केला ४०० कोटीचा टप्पा...
  3. Sunny Deol : सनी देओलने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविण्यास दिला नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.