ETV Bharat / entertainment

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीच्या हुंदक्याने प्रार्थना सभेस उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू - कॉमेडियन राजू श्रीवास्तव ताज्या बातम्या

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी रविवारी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळी राजू श्रीवास्तव यांचे अनेक मित्र आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी प्रार्थना सभेला उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नीने दिवंगत अभिनेत्याबद्दल बोलायला सुरुवात करताच सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.

Raju Srivastava prayer meeting
Raju Srivastava prayer meeting
author img

By

Published : Sep 26, 2022, 5:27 PM IST

मुंबई - कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी रविवारी मुंबईत त्याचे स्मरण करण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळी राजू श्रीवास्तव यांचे अनेक मित्र आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी प्रार्थना सभेला उपस्थित होते. यामध्ये कपिल शर्मा, भारती सिंग, जॉनी लीव्हर, नील नितीन मुकेश, के के मेनन, एहसान कुरेशी आणि किकू शारदा असे अनेक कलाकार कॉमेडियनला आदरांजली वाहण्यासाठी आले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेत अनेक सेलेब्रिटींनी दिवंगत अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना त्यांच्या पत्नीचा आवाज कापरा झाला होता. हुंदके देतच त्यांनी बोलायला सुरुवात केली. 'मेरे तो जिंदगी चली गये' असे म्हणत त्या म्हणाल्या, “ बोलण्यासारखे काही राहिले नाही. माझे आयुष्य आता संपले आहे. सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली, डॉक्टरांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. त्यांनी सर्वांनी आम्हाला हसवले आणि मला खात्री आहे की स्वर्गातही ते सर्वांना हसवत असतील. शांततेत विश्रांती घ्या. धन्यवाद! त्याच्या मित्रांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला” असे त्या म्हणाल्या.

याआधी रविवारी, राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा यांनीही खुलासा केला होता की तिचे वडील एक महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल असताना काहीही कसे बोलले नाहीत. "डॅडी हॉस्पिटलमध्ये काहीही बोलले नाहीत," असे तिने सांगितले. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंब आता दिल्लीला परतणार असून येत्या काही दिवसांत त्यांच्या कानपूर येथील निवासस्थानी पूजाही होणार आहे.

राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात निधन झाले. 9 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, अभिनेते रवी किशन, शेखर सुमन आणि विकी कौशल आणि द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही दिवंगत कॉमेडियनला श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा -पाहा व्हिडिओ : राजू श्रीवास्तवचा गजोधर भैय्या कसा बनला? ऐका त्याच्याच तोंडून...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.