ETV Bharat / entertainment

Rajinikanth's Jailer Releases today : 'जेलर' जगभरात ४००० स्क्रीन्सवर रिलीज, जपानी जोडपे चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईत दाखल - जेलर चित्रपट पाहण्यासाठी जपानी जोडपे भारतात आले

मेगास्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट आज रिलीज झाला. पहाटेपासूनच लोकांनी थिएटर बाहेर रांगा लावल्याचे चित्र तामिळनाडूत पाहायला मिळाले. रजनीकांतचे फॅन केवळ दक्षिण किंवा उत्तर भारतात नाहीत, तर साता समुद्रापारही आहेत. अमेरिकेच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये याचे दर्शन घडत आहे. दरम्यान एक जपानी जोडपे रजनीकांतच्या या जबरदस्त क्रेझचे साक्षीदार बनण्यासाठी चेन्नईत दाखल झाले आहे.

Jailer Movie
जेलर चित्रपट
author img

By

Published : Aug 10, 2023, 12:03 PM IST

Updated : Aug 10, 2023, 12:11 PM IST

मुंबई : मेगास्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट आज १० ऑगस्ट धुमधडाक्यात रिलीज झाला. रजनीकांतच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस हा एखाद्या मोठ्या सणापेक्षा कमी नाही. पहाटेपासूनच दक्षिण भारतातील शहरे रजनीच्या फॅन्सनी जागी केली. मिरवणुका, वाद्यांचा गजर, भव्य कटआऊट्सला अभिषेक, धूप आरती आणि पारंपरिक पूजाविधीसह फॅन्सनी थिएटर बाहेर आतिषबाजी केली. थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी लोकांनी रजनीकांतच्या नावाचा जयघोष केला आणि घोषणांच्या गजरासह 'जेलर'चा खेळ सुरू झाला.

आता पडद्यावर रजनीकांतची एन्ट्री हा तर रजनी फॅन्ससाठी सेलेब्रिशनचा परफेक्ट मूहुर्त असतो, यावेळीही तो चुकला नाही. हा चित्रपट बरा की वाईट असे प्रश्न चाहत्यांना पडत नाहीत, किंबहुना समीक्षकांनी चित्रपटबद्दल काय लिहिलंय हे पाहून फॅन्स चित्रपट पाहायला बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर थलैयवाला पाहणे हाच एकमेव उद्देश बाळगून ते थिएटरपर्यंत पोहोचलेले असतात. 'जेलर'च्या कमाईबद्दल विचार करण्याची आत्ताच घाई नाही कारण अॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने सुमारे २० कोटींची कमाई केली आहे. आजच चित्रपट रिलीज झाला असून तामिळनाडूतील बहुतेक सर्व थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत.

जपानी जोडपे भारतात आले : रजनीकांतचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी दुरून चेन्नईला पोहोचत आहेत. याशिवाय रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट पाहण्यासाठी एक जपानी जोडपे ओसाकाहून चेन्नईला पोहोचले आहे. जपानमधील रजनीकांत फॅन क्लबच्या लीडर यासुदा हिदेतोशीने सांगितले की, 'आम्ही 'जेलर' चित्रपट पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलो आहोत. दरम्यान, जपान मधील हे जोडपे 'जेलर'च्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोबद्दल खूप उत्सुक झाले होते. रजनीकांत दोन वर्षांनी 'जेलर' या चित्रपटातून पडद्यावर परतले आहेत. हा चित्रपट आज जगभरातील ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट तामिळनाडूमध्ये ८०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

याशिवाय या जपानी जोडप्याने थलैयवाची भेट घेतली आणि त्यांना जपानी शाल भेट दिली. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत या जोडप्याने सांगितले की, 'जपानमध्ये भारतीय चित्रपट एक दिवस उशिरा प्रदर्शित होतात, पण आम्ही थांबू शकलो नाही, म्हणून आम्ही भारतात आलो. आम्हाला रजनीकांतच्या चित्रपटाबद्दल भारतीय चित्रपटगृहांमध्ये सर्व रंगभूषा पाहायची आणि अनुभवायची आहे', असे त्यांनी सांगितले. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांतसोबतच तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, जॅकी श्रॉफ मोहनलाल आणि शिवा राजकुमार हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जगभरात तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

  1. GADAR 2 SCREENING : सनी देओलच्या 'गदर २'चे सैनिकांसाठी खास स्क्रिनिंग, जवानांच्या घोषणांनी थिएटर दणाणले
  2. Kushi trailer launch: 'खुशी'साठी सामंथाची कितीही प्रतीक्षा करण्यास तयार होता विजय देवराकोंडा
  3. Parineeti Chopra : परिणीती चोप्राने गायले लता मंगेशकरांचे 'हे' सुंदर गाणे

Last Updated : Aug 10, 2023, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.