मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आगामी 'UT69' या चित्रपटासाठी सज्ज झालाय. तो या चित्रपटात अभिनय करणार आहे. खरंतर त्याच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला तुरुंगवास सोसावा लागला होता. या काळात तो दोन महिने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होता. याकाळात त्याच्यावर झालेले आरोप, कुटुंबाची होणारी बदनामी, व्यवसायातले चढ उतार, पोलिसांशी आलेला संबंध, तुरुंगातील सहकैद्यांसोबतचे व्यवहार, जामिनासाठी सुरू असलेली धडपड, शिल्पाचा पती म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन, अशा असंख्य गोष्टी या चित्रपटातून मोठया पडद्यावर दिसणार आहे. पण हा चित्रपट बनवण्याचा त्याचा विचार नव्हता, असे त्याने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'UT69' या चित्रपटाची निर्मिती कशी झाली, याचा खुलासा करताना राज कुंद्रा म्हणाला, 'चित्रपट बनवण्याचा कोणताच विचार केला नव्हता. माझ्या तुरुंगातील ६३ दिवसांच्या अनुभवावर आधारित एक पुस्तक लिहित होतो. दिग्दर्शक असलेल्या माझ्या मित्रानं त्या संपूर्ण नोटस् वाचल्या. त्यानंतर तो एक महिन्यांनी माझ्याकडे लेखकासह आला. तो मला म्हणाला की, ही कथा वाचताना आमच्या डोळ्यासमोर दृष्ये दिसायला लागली, त्यामुळे आपण यावर चित्रपट बनवू.'
तो पुढे म्हणाला, 'पण आमची एकच अट आहे, त्याने स्वत:ची व्यक्तिरेखा साकारावी. यासाठी आम्ही एक कार्यशाळा केली. मला विश्वास आहे की, तुम्हाला आयुष्यात मिळणारे अनुभव तुम्हाला चांगला अभिनेता बनवत नाहीत. तर तुम्हाला आलेले अनुभव तुम्हाला परिपक्व बनवू शकतात. हे सर्व क्षेत्रात घडत, मग तो व्यवसाय असो किंवा कोणतीही नोकरी.'
'UT 69' चा दिग्दर्शक शाहनवाज अली म्हणाला, 'राज हा पहिल्यांदाच अभिनय करतोय असं वाटत नव्हतं, याचा अर्थ तो एक अप्रतिम अभिनेता आहे. या चित्रपटासाठी मी यापेक्षा चांगलं स्क्रिप्ट, चांगली कथा चांगल्या अभिनेत्याला सांगू शकलो नसतो.' 'UT 69' हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -