नवी दिल्ली - Parliament Special Session : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या सर्व खासदारांनी नव्या इमरातीत प्रवेश केला. संसदेत प्रवेशानंतर पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाची घोषणा केली. ' पंतप्रधान अटलजींच्या काळात अनेक वेळा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं होतं. पण ते मंजूर करण्यासाठी संख्याबळजमा झालं नाही, त्यामुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी देवानं मला निवडलं आहे', असं यावेळी बोलताना नरंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाला 'नारी शक्ती वंदन कायदा' असं नाव देण्यात आलंय.
संसदेत नवं महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता आणि कंगना रणौत यांनी समाधान व्यक्त केलंय. या विशेष कार्यक्रमसाठी या दोन्ही अभिनेत्री दिल्लीत संसद परिसरात हजर होत्या. याविषयी बोलताना अभिनेत्री इशा गुप्ता म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा एक प्रगतशील विचार या निमित्तानं केल्याचं दिसतं. यापूर्वी ही गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता मात्र ते घडू शकलं नव्हतं. या सरकारानं पहिल्या पासूनच महिलांसाठी चांगल्या योजना आखल्या आहेत. बेटी पढाओ बेटी बचाओ ही योजना त्यापैकीच एक होती. पण आता आरक्षणाच्या विधेयकामुळे आता आपल्याला समान सत्ता मिळेल. म्हणतात ना की घरातील लक्ष्मी खूश असणं महत्त्वाचं असतं तसं यामुळे घडून आलंय. मोदींनी नेमकं हेच केलंय. मोदीजींनी पूर्वी म्हटलं होतं ते आता त्यांनी करुन दाखवलंय. यामुळे देशातील महिलांचा विश्वास वाढला आहे. यामुळे देश पुढे जाईल असा विश्वासही इशानं व्यक्त केला. इशाला जेव्हा ती निवडणूक लढवणार का असं विचारलं तेव्हा तिने हो असे उत्तर दिलं.
महिला आरक्षण हा ऐतिहासिक निर्णय - कंगना रणौत
यावेळी हजर असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत केलं. ती म्हणाली, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. संपूर्ण देशासाठी आणि देशातील महिलांसाठी हा मोठा निर्णय आहे. भारत यामुळे एक शक्ती बनेल, संपूर्ण जागासाठी भारत हा एक प्रकाशदायी ठरेल, असंही कंगना म्हणाली.
हेही वाचा -