ETV Bharat / entertainment

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित 'पंचक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Panchak movie Trailer out : अभिनेत्री माधुरी दीक्षितनं सोशल मीडियावर तिच्या आगामी मराठी चित्रपट 'पंचक'चा ट्रेलर चाहत्यासोबत शेअर केलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 5 जानेवारीला प्रदर्शित होईल.

Panchak movie Trailer out
पंचक चित्रपटाचा ट्रेलर आऊट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 6:41 PM IST

मुंबई Panchak movie Trailer out : अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांचा 'पंचक' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण उत्सुकतेनं पाहात आहेत. 'पंचक' चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला चाहत्यांनी खूप पसंत केलं होतं. माधुरीनं या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी केली आहे. 'पंचक' हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकजण चित्रपट हिट होणार असल्याचं म्हणत आहेत.

कसा आहे 'पंचक'चा ट्रेलर : 'पंचक' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटातील काही कलाकार धावताना दिसत आहेत. त्यानंतर एका कुटुंबातील व्यक्तीचं अचानक निधन होतं. या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला पंचक लागतो असं सांगण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता विद्याधर जोशी हे पंचक लागणे म्हणजे काय असते? याचा अर्थ सांगत आहेत. 'पंचक' लागलं म्हणजे एखाद्याच्या मृत्यूच्या घटकेपासून एका वर्षाच्या आत कुटुंबातील किंवा जवळचे पाच मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यानंतर हे ऐकल्यानंतर कुटुंबातील सर्वच व्यक्ती घाबरतात.

'पंचक' चित्रपटात 'या' कलाकारांनी साकारली भूमिका : या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, सतीश आळेकर, भारती आचरेकर,आनंद इंगळे, आरती वडगबाळकर, विद्याधर जोशी, तेजश्री प्रधान, संपदा कुलकर्णी , नंदिता धुरी सागर शोध, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, गणेश मयेकर आणि दिलीप प्रभावळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. माधुरी दीक्षितनं या चित्रपटचा ट्रेलर शेअर करत लिहिलं, "सगळेच विचारतायत 'आता कोणाचा नंबर?' होऊ दे चर्चा, घेऊन आलोय 'पंचक' चा ट्रेलर !! 5 जानेवारीपासून थिएटर्समध्ये लागणार हास्याचा पंचक." तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिच्या या आगामी चित्रपटासाठी तिला अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लांना झाल्या जुळ्या मुलीं, फोटोंसह कळवली मुलींचे नावे
  2. लंडनच्या आयकॉनिक थिएटरमध्ये 'मोऱ्या'चा प्रिमीयर, मराठी चित्रपटाला मिळाला पहिल्यांदाच मान
  3. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लांना झाल्या जुळ्या मुलीं, फोटोंसह कळवली मुलींचे नावे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.