मुंबई - टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी इंडस्ट्रीत तिच्या चांगल्या लूक आणि फिटनेससाठी ओळखली जाते. गेली दोन दशके श्वेता इंडस्ट्रीमध्ये स्वतःला नीटनेटके ठेवत आली आहे. श्वेताला जेव्हा तिची मुलगी पलकचे पुरुष मित्र हॉट म्हणतात तेव्हा पलक हिला हे खूपच 'विचित्र' वाटते.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, पलकने आई बद्दल प्रशंसा करणाऱ्या तिच्या मित्रांबद्दल सांगितले. तिच्या मित्रांमध्ये असलेल्या श्वेताच्या आकर्षणाबद्दल बोलताना पलक म्हणाली, "ही सर्वात विचित्र गोष्ट आहे. मी माझ्या अनेक मित्रांना ओरडले आहे. तिच्यावर प्रेम आहे असे त्यांनी थेट म्हटलेले नाही, पण 'तुझी आई खूप हॉट आहे हं', असे ते म्हणतात. तुम्ही काहीही म्हणा माझी आई याकडे दुर्लक्ष करेल, असे मी म्हणते. ती माझ्या वयाच्या प्रत्येकाला आईच्या मायेने बेटा म्हणत असते. जेव्हा माझे मित्र श्वेता तू खूप हॉट आहेस, असे म्हणतात तेव्हा ती, 'ये निकाल इसको', असे म्हणते.''
पलक म्हणाली, "मला ती खूप आवडते. खरं तर, जेव्हा मी लहान होते, तेव्हापासून मला ती आवडते. कारण माझ्या नानी (आजी) मला शाळेतून घेऊन जायच्या, तेव्हा मी चिडचिड करायचे. पण ज्या दिवशी माझी आई मला न्यायला येत होती तेव्हा मला असे वाटत होते की 'अरे, माझी आई सुंदर आहे आणि प्रत्येकजण तिच्याकडे एकटक पाहत आहे. मी म्हणायचे, 'हो, हो ती माझी आई आहे, म्हणून.' मला खूप मस्त वाटायचे. आजपर्यंत असेच आहे, 'ती माझी आई आहे. मला याचा खूप अभिमान वाटतो."
पलक तिवारीने नुकतीच शोबिझमध्ये एन्ट्री केली आहे. गायक हार्डी संधूसोबतच्या 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडिओमुळे ती प्रसिद्ध झाली. तिचा आगामी 'मांगता है' म्युझिक व्हिडिओ येत आहे, ज्यामध्ये ती आदित्य सीलसोबत दिसणार आहे. पलकही 'रोझी: द सॅफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हेही वाचा - Shweta Tiwari Controversy : श्वेता तिवारीचे वादग्रस्त विधान, म्हणते: ''माझ्या 'ब्रा'ची साइज...''