ETV Bharat / entertainment

kartik aaryan : कार्तिक आर्यनच्या नावाखाली झाली ८३ लाखांची फसवणूक; आरोपीवर गुन्हा दाखल...

कार्तिक आर्यनसोबत भेट घडवून आणण्याचे खोटे आश्वासन देऊन एका महिलेला ८२.७५ लाखाचा चुना लागला आहे. या महिलेला चित्रपट निर्माता बनण्याची इच्छा होती. मात्र आता या महिलेने आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

kartik aaryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Jul 5, 2023, 11:44 AM IST

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनसोबत भेट घडवून आणण्याचे खोटे आश्वासन देऊन एका महिलेला ८२.७५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. ३ जुलैला आंबोली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांनी दिल्लीतील कृष्णा शर्माच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेची फसवणूक : दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, गोरेगाव पूर्व येथील रहिवासी असलेल्या ३९ वर्षीय ऐश्वर्या शर्माला चित्रपट निर्माता बनण्याची इच्छा होती. अनेक प्रयत्नांनंतर तिला कृष्णा शर्मा नावाचा माणूस भेटला, जो मूळचा नवी दिल्लीचा आहे. तक्रारीनुसार, आरोपीने मोठे आश्वासन देऊन ऐश्वर्याचा विश्वास संपादिन केला. 'लव्ह इन लंडन' या चित्रपटासाठी तो कार्तिकची भेट घडवून आणेल, ज्यामध्ये ती निर्माती असेल असे आश्वासन त्याने तिला दिले होते.

कार्तिक आर्यनच्या नावाखाली झाली फसवणूक : आरोपी कृष्णाने ऐश्वर्याला पैसे देण्यास राजी केले आणि हळूहळू एकूण ८२.७५ लाख रुपयांची मागणी केली. ८५.७५ लाख रुपये दिल्यानंतर ऐश्वर्याने आर्यनसोबत कृष्णा भेट करून देणार होता याबद्दल चौकशी केली. मात्र, आरोपीने वारंवार बहाणे सुरू केले आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. तिचे पैसे परत केले नाहीत. खोटे आश्वासन देऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ऐश्वर्याने कृष्णा शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल केला. अंबोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अन्वयेनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेता कार्तिक आर्यनची भेट घडवून आणण्याच्या बहाण्याने तब्बल ८३ लाख रुपयांचा चुना या महिलेला लावण्यात आला आहे.

कशी झाली फसवणूक : कृष्णाने 'लव्ह इन लंडन' या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनची भेट घडवून आणण्याचे आमिष ऐश्वर्या दाखवले होते. चित्रपट रिलीज करण्याच्या नावाखाली तिच्याकडून प्रचंड पैसे उकळले. मात्र, त्याने कार्तिक सोबत भेट करून दिली नाही. तसेच चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती तिला दिली नाही. तिचे पैसे परत न करता त्याने तिची फसवणूक केली. असा आरोप ऐश्वर्याने पोलिसांकडे केला आहे.

हेही वाचा :

  1. Satyaprem Ki Katha Box Office Collection :'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने सहव्या दिवशी केली 'इतके' रूपयांची कमाई...
  2. DARA SINGH SON VINDU DARA SINGH : आदिपुरुषमधील हनुमानजींच्या पात्रावर दारा सिंहचा मुलगा संतापला
  3. Satyaprem Ki Katha : कार्तिक आर्यनने कियारा अडवाणीसोबत सोशल मीडियावर शेअर केला भन्नाट व्हिडिओ..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.