ETV Bharat / entertainment

रणबीर आलियाच्या लग्नाचे भन्नाट, व्यंग दाखवणारी मिश्कील मीम्स - Ranbir Alia Kalpak Memes

रणबीर आलियाचा विवाह सोहळा बॉलिवूड जगतातील टॉक ऑफ द टाऊन असा विषय होता. अशावेळी कल्पक मीम्स बनले नाहीत तरच नवल. त्यांच्या विवाहावर बनलेल्या काही मीम्सवर नजर टाकूयात...

रणबीर आलियाच्या लग्नाचे मीम्स
रणबीर आलियाच्या लग्नाचे मीम्स
author img

By

Published : Apr 15, 2022, 5:18 PM IST

रणबीर आलियाचा विवाह सोहळा बॉलिवूड जगतातील टॉक ऑफ द टाऊन असा विषय होता. अशावेळी कल्पक मीम्स बनले नाहीत तरच नवल. त्यांच्या विवाहावर बनलेल्या काही मीम्सवर नजर टाकूयात...

रणबीर आलियाच्या लग्नाकडे संपूर्ण मीडिया डोळे लावून बसला होता. अखेर त्यांचे लग्न झाल्याची घोषणा झाली आणि एक मीम्स झळकला. ज्या प्रमाणे एकादे अंतराळ यानाने यशस्वी उड्डान केल्यानंतर जितका आनंद शास्त्रज्ञांना होतो, तसाच आनंद माध्यमांना गॉसिपींगच्या बातम्या पुरवणाऱ्यांना झाल्याचे या मीम्समध्ये दिसते.

दुसऱ्या मीम्समध्येही कल्पकता पाहायला मिळते. या विवाह सोहळ्यासाठी ड्रेस डिझाईन करणाऱ्यांना किती आनंद झाला असेल याचे एक मीम्स व्हायरल झाले. यात परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टीच्या गाजलेल्या हेरा फेरीचा पैसा ही पैसा होगा हा सीन मीम्समध्ये वापरला आहे.

रणबीर आलियाचा विवाह निश्चित झाल्यापासून मीडिया दोघांच्याही घराबाहेर तैनात झाला. याचे एक सुंदर कोलाज पाहायला मिळाले.

रणबीर कपूरवर क्रश असलेल्या मुलींना त्याचे लग्न झाले असल्याची बातमी कळताच त्या कशा रडतील याचा डेमो आलियाने यात दाखवला आहे.

रणबीर कपूर हा मोस्ट एलिजेबल बॅचलर समजला जात होता. मात्र तोही आलियाच्या जाळ्यात अडकल्यानंतरची एक प्रतिक्रिया या मीम्समध्ये पाहायला मिळते.

आलिया आणि रणबीरच्या घराबाहेर ठाण मांडून बसलेल्या मीडियाचे व्यंगात्मक वर्णन करणारा फोटो या मीम्समध्ये पाहायला मिळाला.

न्यूज चॅनल्सचे प्रतिनिधीही आलिया रणबीरची एक झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी झटत होते. यावर एक सुंदर मीम्स बनले आहे.

दुसऱ्या एका मीम्समध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील भाषणाचा फोटो वापरण्यात आला. पत्रकारांनी हा विवाहसोहळा प्रीण पणाला लावून कव्हर केल्याचे व्यंग यातून दिसते.

रणबीरवर क्रश असलेल्या मुलींची अवस्था दाखवणारे आणकी एक मीम पाहायला मिळाले. यात क्वीनमधील कंगना रणौत रडतानाचा फोटो वापरण्यात आला आहे.

या विवाह सोहळ्याला मोजकेच सेलेब्रिटी आमंत्रीत होते. याचे दुःख अनेकांना झाले असेल. पण केबीसीत जसे घर बसल्या खेळात सहभागी होता येते याचे एक मीमही जोरात चर्चेत आहे.

हेही वाचा - पाहा, रणबीर आणियाच्या लग्नातील वरमाला सोहळ्याचा धमाल व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.