मुंबई - Mandali official teaser out : 'मंडली' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर 8 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. 'मंडली'चे दिग्दर्शन राकेश चतुर्वेदी यांनी केले असून प्रशांत कुमार गुप्ता, नीतू सबरवाल आणि गीतिका गुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 28 ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 'मंडली'मध्ये अभिषेक दुहान, विनीत कुमार, आंचल मुंजाल, अलका अमीन, अश्वथ भट्ट, सहर्ष शुक्ला कंवलजीत सिंग, रजनीश दुग्गल, ब्रिजेंद्र काला आणि नीरज सूद आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मंडली'ची कहाणी रंगमंचावर आणि स्टेजच्या बाहेरही रामलीला करणाऱ्या कलाकारांच्या जीवनावर आधारित असल्याचं टीझरवरुन लक्षात येतंय. छोट्या शहरांमधील कलाकारांना आर्थिक फायद्यासाठी किती धडपड करावी लागते, याबद्दल 'मंडली'मध्ये पाहायला मिळणार आहे.
रजनीश दुग्गल यांनी शेअर केला टीझर : दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी यांनी 'मंडली'बद्दल बोलताना सांगितलं, 'माझे ध्येय चित्रपट निर्मात्यांसोबत सहयोग करणं आहे. 'मंडली' चित्रपटाचा विषय नाविन्यपूर्ण विषय आहे'. याशिवाय रजनीश दुग्गल यानं चित्रपटाचा टीझर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या पोस्टवर रजनीशने लिहिलंय, 'मंडली' टीझर परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील कालातीत संघर्षाची झलक देतो. अधिक माहितीसाठी संपर्कात रहा. 27 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे,' अशी पोस्ट कॅप्शन दिली आहे. हा टीझर युजर्सला खूप आवडला आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करून चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका युजरनं म्हटलं, 'तुला या चित्रपटासाठी शुभेच्छा जय श्री राम' याशिवाय अनेकजणांनी या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
चित्रपटाचा टीझर यूट्युबवर प्रदर्शित : 'मंडली' हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. या चित्रपटाकडून दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी यांना खूप अपेक्षा आहेत. राकेश चतुर्वेदी दिग्दर्शित हा वेगळ्या वळणावरचा चित्रपट किती प्रेक्षकांना पसंत पडणार, हे काही दिवसांमध्ये समजेल. या चित्रपटाचा 1 मिनिट 3 सेकंदाचा टीझर यूट्युबवर प्रदर्शित करण्यात आला. मनोरंजनाबरोबरच काहीतरी विचार देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचं टीझर पाहताना जाणवतं.
हेही वाचा :
- Ganapath : माजी क्रिकेटर इरफान पठाण आणि श्रीसंतसोबत 'हे' कलाकार थिरकले स्टार स्पोर्ट्स स्टुडिओत...
- Shahid Kapoor and Shahrukh Khan : शाहरुख खानशी तुलना केल्यानं शाहिद कपूर झाला नाराज...
- Mission Raniganj New Song : मिशन रानीगंज'मधील अक्षय कुमारनं शेअर केले 'जीतेंगे'चे मोशन पोस्टर; 'या' तारखेला रिलीज होणार गाणे...