ETV Bharat / entertainment

PK Rosy Google : भारतातील पहिल्या दलित अभिनेत्रीचा गुगल डूडलमार्फत सन्मान, जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य - पीके रोझी गुगल डूडल

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री पीके रोझीची आज 120वी जयंती आहे. गुगलने आपल्या डूडल मार्फत या अभिनेत्रीचा सन्मान केला आहे. रोझी भारतीय सिनेमातील पहिली दलित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जाणून घ्या रोझीच्या संघर्षमयी जीवनाबद्दल संक्षिप्तपणे..

PK Rosy
पीके रोझी
author img

By

Published : Feb 10, 2023, 7:34 AM IST

Updated : Feb 10, 2023, 7:47 AM IST

तिरुअनंतपुरम (केरळ) : गुगलने आज त्यांच्या डूड मार्फत मल्याळम सिनेमातील पहिली आघाडीची महिला अभिनेत्री पीके रोझीचा सन्मान केला आहे. ज्या काळात समाजातील अनेक घटक विशेषतः महिलांसाठी कला सादर करणे अत्यंत अवघड होते, त्या काळात रोझीने विगाथाकुमारन (द लॉस्ट चाइल्ड) या मल्याळम चित्रपटातील तिच्या भूमिकेने समाजातील सर्व अडथळे तोडले. आजही तिची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

कक्करीस्सी नाटकमचे शिक्षण घेतले : रोझीचा जन्म 1903 मध्ये आजच्याच दिवशी केरळच्या तिरुअनंतपुरम येथे झाला होता. तिचे कुटुंब तिरुवनंतपुरमच्या नादानकोडे येथे राहत होते. तिच्या कुटुंबाचा गवत कापण्याचा व्यवसाय होता. रोझीला अभिनयाची आवड लहान वयातच लागली. तिने पारंपारिक स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये कक्करीस्सी नाटकमचे शिक्षण घेतले. हा लोककला प्रकार मूळतः तामिळनाडूचा आहे. ह्या लोककलेत मल्याळम आणि तमिळ संस्कृतीचे संगीत नाटकाच्या स्वरूपात मिश्रण आढळते. या लोककलेतील कथा शिव आणि पार्वती यांच्याभोवती फिरतात. जे भटक्या जमातीतील भविष्य सांगणारे कक्कलन आणि कक्कठी म्हणून पृथ्वीवर येतात.

भारतातील पहिली दलित अभिनेत्री : रोझी भारतीय सिनेमातील पहिली दलित अभिनेत्री होती. 1930 मध्ये तिने जेसी डॅनियल दिग्दर्शित विगथाथाकुमारन चित्रपटात एका उच्चवर्णीय नायर महिलेची भूमिका करण्याचे धाडस केले होते. जेसी डॅनियलने सुरुवातीला सुश्री लाना या मुंबईतील महिला अभिनेत्रीला विगथाकुमारनमध्ये अभिनय करण्यासाठी आणले. तेव्हा केरळमधील कोणतीही महिला चित्रपटात काम करायला तयार नव्हती. त्याने तिच्यासोबत चित्रपटाचे थोडेसे चित्रीकरण देखील केले. परंतु ती त्याच्या अपेक्षांना पूर्ण करू शकली नाही. त्या नंतर या भूमिकेसाठी पीके रोझीचा विचार केला गेला. तिरुअनंतपुरमच्या कॅपिटल सिनेमात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा एका दलित महिलेने नायर महिलेची भूमिका केल्यामुळे प्रेक्षक संतापले होते. या चित्रपटात रोझीचा प्रियकर तिने केसात घातलेल्या फुलाचे चुंबन घेताना एक दृश्य होते. यामुळे लोक इतके संतापले की त्यांनी स्क्रीनवर दगडफेक करून त्याचे नुकसान केले.

तामिळनाडूमध्ये पळ काढला : त्यानंतर एका दलित महिलेने उच्चवर्णीय महिलेची भूमिका केल्याने संतप्त झालेल्या उच्चवर्णीयांनी तिचे घर जाळले. जीवाच्या भीतीने रोझीने तामिळनाडूला जाणाऱ्या लॉरीमध्ये पळ काढला. त्यानंतर तिने लॉरी चालक केशवन पिल्लईशी लग्न केले आणि तिचे उर्वरित आयुष्य 'राजम्मल' म्हणून जगले. 1988 मध्ये वयाच्या 85व्या वर्षी रोझीचा मृत्यू झाला. आताच्या पिढीला रोझीच्या नावाचा विसर पडू नये म्हणून मल्याळम चित्रपट उद्योगातील वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) ने अलीकडेच घोषणा केली आहे की ते पीके रोझीच्या नावाने एक फिल्म सोसायटी सुरू करणार आहेत.

हेही वाचा : Sridevi biopic : श्रीदेवीच्या जीवनावर बनणार बायोपिक, बोनी कपूर यांनी केली घोषणा

Last Updated : Feb 10, 2023, 7:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.