मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री मधुबालाच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मधुबालाची धाकटी बहीण मधुर ब्रिज भूषण हिने 'शक्तिमान' निर्मात्यांसोबत या बायोपिकसाठी हातमिळवणी केली आहे. मधुर ब्रिज भूषण म्हणते, "माझ्या लाडक्या बहिणीसाठी काहीतरी करायचं हे माझं दीर्घकाळापासूनचं स्वप्न होतं, जिने खूप लहान पण क्षणिक आयुष्य जगलं. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी आणि माझ्या सर्व बहिणींनी हातमिळवणी केली आहे. देवाच्या आशीर्वादाने, आणि माझे भागीदार, अरविंदजी, प्रशांत आणि विनय यांचे समर्पण यासाठी लाभले आहे. मला विश्वास आहे की हा बायोपिक एका भव्य स्तरावर यशस्वीपणे साकारला जाईल. हा प्रकल्प सुंदरपणे साकारण्यासाठी आम्हाला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे."
-
MADHUBALA BIOPIC ALL SET TO TAKE OFF... Legendary actress #Madhubala's youngest sister #MadhurBrijBhushan has teamed up with #Shaktimaan producers #BrewingThoughtsPLtd [headed by ex-film journalist #PrashantSingh, #MadhuryaVinay] for #Madhubala biopic. pic.twitter.com/BTmRBt1xrT
— taran adarsh (@taran_adarsh) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">MADHUBALA BIOPIC ALL SET TO TAKE OFF... Legendary actress #Madhubala's youngest sister #MadhurBrijBhushan has teamed up with #Shaktimaan producers #BrewingThoughtsPLtd [headed by ex-film journalist #PrashantSingh, #MadhuryaVinay] for #Madhubala biopic. pic.twitter.com/BTmRBt1xrT
— taran adarsh (@taran_adarsh) July 18, 2022MADHUBALA BIOPIC ALL SET TO TAKE OFF... Legendary actress #Madhubala's youngest sister #MadhurBrijBhushan has teamed up with #Shaktimaan producers #BrewingThoughtsPLtd [headed by ex-film journalist #PrashantSingh, #MadhuryaVinay] for #Madhubala biopic. pic.twitter.com/BTmRBt1xrT
— taran adarsh (@taran_adarsh) July 18, 2022
ती पुढे म्हणाली, "माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे की - फिल्म इंडस्ट्रीतील आणि बाहेरील - माझ्या परवानगीशिवाय माझ्या बहिणीच्या जीवनावर आधारित बायोपिक किंवा इतर कोणत्याही प्रकल्प बनवण्याचा प्रयत्न करू नका."
1969 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झाले. 50 च्या दशकाच्या सुरुवातीला तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि तिने हॉलीवूडमध्येही स्थान मिळवले. ती 1952 मध्ये अमेरिकन नियतकालिकात दिसली. 2019 मध्ये मधुबालाची बहीण, मधुर ब्रिज भूषण यांनी तिच्या जीवनावर बायोपिक बनवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळी, त्यांच्या मोठ्या बहिणीकडून या चित्रपटाबद्दल आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे बायोपिक तेव्हा बनवता आला नव्हता.
हेही वाचा - मणिरत्नम यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, फिल्म इंडस्ट्रीने सोडला सुटकेचा निश्वास