ETV Bharat / entertainment

My Dads Wedding : लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'माय डॅड्स वेडिंग'चे संपूर्ण शूटिंग होणार लंडनमध्ये - अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट

सनई चौघडे, वळू, संहिता सारख्या चित्रपटांनंतर त्यांच्या मुक्ता आर्टस्तर्फे ‘विजेता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता सुभाष घई एका नव्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले आहे. आगामी ‘माय डॅड्स वेडिंग' ( My Dads Wedding ) चे दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते करीत आहे. हा चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे होणार आहे.

My Dads Wedding
My Dads Wedding
author img

By

Published : Apr 25, 2022, 8:54 AM IST

मुंबई : अनेक हिट चित्रपट देणारे बॉलिवूडमधील शोमॅन सुभाष घई यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. सनई चौघडे, वळू, संहिता सारख्या चित्रपटांनंतर त्यांच्या मुक्ता आर्टतर्फे ‘विजेता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता सुभाष घई एका नव्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले आहे. आगामी ‘माय डॅड्स वेडिंग' चे दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते करीत आहे. हा चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे होणार आहे.

Lokesh gupte
लोकेश गुप्ते
‘माय डॅड्स वेडिंग'चे निर्माते सुभाष घई म्हणाले, ''मराठी चित्रपटात नेहमीच सर्वोत्कृष्ट आशय असतो. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. येत्या काळातही मी अनेक दर्जेदार मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'माय डॅड्स वेडिंग'बद्दल सांगायचे तर हा विषयच खूप वेगळा आहे. संवेदनशील नाते या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे.''
My Dads Wedding
सुभाष घईंची निर्मिती

सुभाष घईंची निर्मिती
सुभाष घई प्रस्तुत, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, मुक्ता आर्ट लिमिटेड, म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत तर निनाद बट्टीन, तबरेज पटेल यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. मिहीर राजडा, लोकेश विजय गुप्ते यांनी चित्रपटाचे लेखन केले असून प्रदीप खानविलकर छायाचित्रण करणार आहेत. सुभाष घई यांची निर्मिती, लोकेश गुप्ते यांचे दिग्दर्शन यामुळे हा एक जबरदस्त चित्रपट असणार आहे यात दुमत नसेल आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हेही वाचा - Working Birthday For varun Dhawan : बवाल चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनने साजरा केला वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.