ETV Bharat / entertainment

Tiger 3 Song Out : 'टायगर 3'च्या डान्स नंबरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफमध्ये दिसली जबरदस्त केमिस्ट्री... - लेके प्रभु का नाम रिलीज

Tiger 3 Song Out : 'टायगर 3' या आगामी चित्रपटातील 'लेके प्रभु का नाम' हे पहिलं गाणं अखेर रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान खान आणि कतरिना कैफची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे.

Tiger 3 Song Out
टायगर 3चं गाणं झाल रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 2:12 PM IST

मुंबई - Tiger 3 Song Out : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'टायगर 3' हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान आता 'टायगर 3' चित्रपटामधील 'लेके प्रभु का नाम' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला अनेकजण पसंत करत आहे. या लाइव्ह डान्स नंबरमध्ये, सलमान आणि कतरिना हे ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. मनिष शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लेके प्रभु का नाम' गाण्याबद्दल : अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले 'लेके प्रभु का नाम' हे गाणं अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे. प्रीतमनं या गाण्याला संगीत दिले आहे. अरिजित आणि सलमानमधील 9 वर्षांच्या कोल्ड वॉरनंतर त्यांनी या गाण्याद्वारे एकत्र काम केले आहे. या गाण्यात सलमान खान (टायगर) आणि कतरिना कैफ (झोया) त्यांच्यात जबरदस्त केमिस्ट्रीसह त्यांचे डान्स मूव्ह्ज देखील खूप जबरदस्त दिसत आहे. या गाण्याचं संगीत खूप दमदार आहे. यशराज फिल्म्स त्यांचा हा आगामी 'टायगर 3' चित्रपट 12 नोव्हेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

'टायगर 3'चं पहिलं गाणं : 'लेके प्रभु का नाम' या गाण्याप्रमाणेच 'एक था टायगर' मधील 'माशाल्लाह' हे गाणं हिट झालं होत. या गाण्याला देखील चाहत्यांनी खूप प्रेम दिलं होतं. 'टायगर 3'मधील 'लेके प्रभु का नाम' हे गाणं तुर्कीमधील कॅपाडोशिया येथे शूट करण्यात आला आहे. 'टायगर 3'बद्दल बोलायचं झालं तर, हा यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा 'टायगर' फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 'टायगर 3' मध्ये शाहरुख खान कॅमियो करताना दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करेल असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Anushka sharma and virat kohli : अनुष्का शर्मानं पती विराट कोहलीसाठी केली 'ही' पोस्ट...
  2. Gautami Tadimalla Resigns : २५ वर्षे भाजपाशी एकनिष्ठ असताना अभिनेत्री गौतमी यांनी दिला राजीनामा, पक्षाच्या नेत्यांवर 'हे' केले गंभीर आरोप
  3. Leo Box Office Collection Day 5: थलापथी विजयचा चित्रपट पाचव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.