मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ३१ जुलै २०२३ रोजी तिचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. कियारा ही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिला चित्रपटसृष्टीत कोणाच्याही परिचयाची गरज नाही. कियाराने फार कमी कालावधीत चित्रपटसृष्टीत आपले नाव लोकप्रिय केले आहे. साधी भूमिका असो वा नखरा शैली, कियारा प्रत्येक भूमिकेत जबरदस्त वाटते. कियाराची खूप फॅनफॉलोविंग आहे. याशिवाय सध्या तिचे बॉलिवूडमध्ये मोठ्या मोठ्या बॅनरचे चित्रपट रूपेरी पडद्यावर येत आहेत. चला तर कियारा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री कशी बनली हे जाणून घेऊया.
कियारा अडवाणीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता : कियारा अडवाणीचा पहिला चित्रपट २०१४मध्ये आलेला 'फगली' होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही आणि सुपर फ्लॉप ठरला. कियाराचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला मात्र तिने आपली मेहनत सुरूच ठेवली आणि त्यानंतर क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीवर बनलेल्या 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली. याच चित्रपटाने कियाराचे नशीब जमिनीवरून सिंहासनावर आणले आणि तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. यानंतर कियाराने कधीच मागे वळून पाहिले नाही.
कियाराने तिच्या छोट्या करिअरमध्ये अनेक चित्रपट हिट दिले : कियाराचा 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर तिली अनेक बॉलिवूड चित्रपटांची ऑफिर मिळू लागली. तिने 'मशीन', 'सीआयडी', 'लस्ट स्टोरी',' भूल भुलैया २', 'शेरशाह' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. तसेच कियाराला शाहिद कपूरसोबत 'कबीर सिंग' हा चित्रपट मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला होता. या चित्रपटामधली कियाराची साधी शैली लोकांच्या मनाला भिडली. यानंतर कियाराचे 'गुड न्यूज', 'जुग जुग जिओ' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मने जिंकली. आता नुकताच प्रदर्शित झालेला 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला. यासह कियारा आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. कियाराच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिने यावर्षी ७ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केले. 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कियारा आणि सिद्धार्थ प्रेमात पडले होते. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने सात फेरे घेतले. सध्या कियारा आणि सिद्धार्थ हे वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशी गेले आहेत.
हेही वाचा :