ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुरानाच्या फोटोवर कार्तिक आर्यनचे भन्नाट उत्तर - कार्तिक आर्यन आणि आयुष्मान खुराना पोस्ट

आयुष्मान खुरानाच्या एका पोस्टवर कार्तिक आर्यनने असे चुकीचे उत्तर दिले आहे की सोशल मीडियावर चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत.

आयुष्मान खुरानाच्या फोटोवर कार्तिक आर्यनचे भन्नाट उत्तर

author img

By

Published : Jul 12, 2022, 3:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा हिट चित्रपट 'विकी डोनर' फेम अभिनेता आयुष्मान खुराना चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. चित्रपटाबद्दल सांगायचे तर, तो अखेरचा अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अनेक’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने विशेष काही करामत बॉक्स ऑफिसवर केली नाही. याशिवाय आयुष्मान खुराना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने पोस्ट केलेला शर्टलेस फोटो. यावर अभिनेता कार्तिक आर्यनने असे उत्तर दिले आहे की आता कोणीही काही बोलण्याच्या स्थितीत नाही.

आधी आयुष्मानच्या त्या फोटोबद्दल बोलूया जिथून संपूर्ण गोष्ट सुरू झाली. आयुष्मान खुराना सध्या कुटुंबासोबत सुट्टीवर आहे आणि फोटो शेअर करत आहे. यातील एका फोटोमुळे आयुष्मान खुरानाची तारांबळ उडाली आहे.

या फोटोत आयुष्मान खुराना सावरिया पोजमध्ये टॉवेल घालून बाल्कनीत उभा आहे आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय 'मी कुठे आहे...याचे फक्त उत्तर द्या.' आता आयुष्मानच्या या पोस्टवर चुकीचे उत्तर देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड कामाला लागले आहे. यावर सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक आर्यन आणि आयुष्मान खुराना पोस्ट
कार्तिक आर्यन आणि आयुष्मान खुराना पोस्ट

सर्वात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यनच्या फोटोवरील प्रतिक्रियेने. आयुष्मानच्या या फोटोला मजेशीर उत्तर देताना अभिनेत्याने लिहिले, 'माझ्या खोलीत'. कार्तिकचे हे उत्तर अनेक चाहत्यांना आवडले आहे. यावर आयुष्मान खुरानाने लिहिले की, 'मी येऊ शकतो, मी दूर नाही'. कार्तिक आर्यन सध्या कुटुंबियांसोबत युरोप दौऱ्यावर आहे.

आयुष्मान खुराना आणि कार्तिक आर्यन खूप चांगले मित्र आहेत आणि नुकतेच दोघेही एकत्र स्पॉट झाले होते.

हेही वाचा -''गड्या आपला गावंच बरा'', पंकज त्रिपाठीने गाठले जन्म गाव!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.