मुंबई Kartik Aaryan : कार्तिक आर्यन 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा रुपेरी पडद्यावर खूप हिट झाला होता. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. कार्तिकच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. कार्तिक सोशल मीडियावर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबाबत अनेक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. दरम्यान आता कार्तिकनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो चॅम्पियनसारखा दिसत आहे. कार्तिक आर्यन ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे.
कार्तिक आर्यनचा व्हिडिओ : कार्तिक आर्यननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो रस्त्यावर धावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिकनं काळ्या रंगाचा चष्मा घातलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये कार्तिक रस्त्यावर धावत असून तो एका ट्रेनरसोबत आहे. कार्तिकनं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'चंदू चॅम्पियन' हॅशटॅगसह लिहिले, 'लक्ष्याचा पाठलाग केला'. या व्हिडिओमध्ये, त्याचा आत्मविश्वास दिसत आहे. कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' मधील फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली. या चित्रपटाकडून कार्तिकला खूप अपेक्षा आहेत.
कार्तिक आर्यनचा लूक : 'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिकचा लूक खूप आकर्षक आहे. या चित्रपटामधील त्याचा लूक हा खेळाडूप्रमाणे आहे. या चित्रपटामध्ये चंदूचे केस खूपच लहान असून तो काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये आहे. त्याच्या चेहऱ्यावरही काही जखमांच्या खुणा आहेत. या चित्रपटामध्ये तो गंभीर लूकमध्ये दिसत आहे. हा चित्रपट 14 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'चंदू चॅम्पियन'मध्ये कार्तिक आर्यन 1970 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स आणि 1972 मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुरली पेटकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये कार्तिकसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल.
हेही वाचा :