मुंबई - बॉलिवूडचे सुंदर जोडपे करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू लवकरच आई वडील होणार आहेत. लग्नाच्या 6 वर्षांनंतर बिपाशा पहिल्यांदाच आई होणार आहे. 16 ऑगस्टला बिपाशाने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची चाहत्यांना खुशखबर दिली होती. यानंतर या जोडप्याच्या अभिनंदनाचा ओघ सुरू झाला. बिपाशा आता तिचे मॅटर्निटी फोटोशूटही शेअर करत आहे. आता पती करण सिंग ग्रोव्हरने गर्भवती पत्नी बिपाशा बसूसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर बिपाशाची कमेंटही आली आहे.
करण सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो पत्नी बिपाशाला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. या दोघांमधील प्रेम फोटोत पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत करणने लिहिले आहे की, 'सर्व काही माझे आहे'.
या फोटोवर कमेंट करताना बिपाशानेही दाद दिली आहे. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पूर्वी 7 जूनला बिपाशाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता आणि हे सर्व अंदाज खरे ठरले.
चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी देताना बिपाशाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले, एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, आमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश किरणाचे आगमन, या क्षणाने आम्हाला खूप आनंद दिला आहे, आम्ही हे वैयक्तिकरित्या सुरू केले आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही दोघे झालो.
बिपाशाने पुढे लिहिले की, 'आमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, आमच्यावर थोडा अन्याय झाला, पण लवकरच... आम्ही दोनाचे तीन होणार आहोत.. आमच्या प्रेमाची नवी सुरुवात, आमचे बाळ सोबत असेल आणि आमचे सुंदर आयुष्यही.
बिपाशाने पुढे लिहिले की, 'तुम्हा सर्वांचे आभार, तुमच्या बिनशर्त प्रेमसाठी, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद, आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद.'
7 जून रोजी बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'अलोन' चित्रपटाचा एक फोटो शेअर केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले ''Alone… 7 जून 2014 च्या सेटवर एकत्र काम करण्याचा आमचा पहिला दिवस.'' भेटीनंतर काही महिने डेटिंग केल्यानंतर बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने २०१६ साली लग्न केले. करणचे हे तिसरे लग्न होते.
हेही वाचा - के एल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख नाही पण विवाहस्थळ ठरले