मुंबई - चित्रपट निर्माता करण जोहरने नेटफ्लिक्सवरील डॉक्यु मालिका द रोमॅंटिक्स पाहिल्यानंतर यशराज फिल्म्सच्या चित्रपटांना मनापासून सलाम केला आहे. स्मृती मुंद्रा दिग्दर्शित, 'द रोमॅंटिक्स' ही डॉक्यूमेंट्री चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा अतुलनीय कारकिर्दीचा प्रवास आणि त्यांचा वारसा सांगते. यात हिंदी भाषेतील चित्रपट उद्योगातील 35 आघाडीचे कलाकार आपले बहुमोल योगदान देताना दिसतात. बॉलिवूडच्या इतिहासात गेल्या 50 वर्षात यशराज फिल्म्सच्या प्रभावाच्या माध्यमातून बॉलिवूडला जागतिक स्तरावर एक उत्तम ओळख मिळाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बुधवारी इन्स्टाग्रामवर करण जोहरने त्याच्या अनेक भावना शेअर केल्या. त्यांनी लिहिले, 'नेटफ्लिक्सवरील स्मृती मुंद्रा दिग्दर्शित द रोमँटिक्स ही मालिका पाहिली आणि मला जाणवले की शुद्धता, निर्दोषता आणि आपल्या सर्वांनी एकत्रितपणे केलेला विश्वास... आज आपल्यातील अनेकांसाठी गमावला आहे. यश चोप्रा हे केवळ प्रणयाची आख्यिका नव्हते तर ते शिफॉन, संगीत आणि सौंदर्याचे पारखी होते. ते संगीताचे उस्ताद होते आणि ते विश्वासाचे आधारस्तंभही होते... काही खात्री आहे का? आज आम्ही मीडियाच्या समालोचनाने भारावलो आहोत, बॉक्स ऑफिस ओपनिंग अॅनालिटिक्स, रिसर्च इंजिन्स (सर्व कदाचित तंत्रज्ञान आणि काळाशी संबंधित आहेत) हे सर्व आहे पण जुन्या पद्धतीचा विश्वास कुठे नाहीसा झाला.... रोमँटिक डॉकियूमेंट्री आपल्याला भूतकाळाची आठवण करून देते. खूप नैसर्गिक रित्या आणि मनापासून.... मला चित्रपट निर्मितीच्या त्या झोनमध्ये परत जायचे आहे.'
करण पुढे म्हणाला, "मी यशराज फिल्म्सच्या कथांनी खूप प्रेरित झालो आहे... तिची उत्पत्ती आहे आणि तिचा प्रवास आहे.... स्टुडिओच्या कॉरिडॉरमधून मला जे काही माहित आहे ते शिकून मी धन्य झालो आणि रोमँटिक्स पाहिल्यामुळे मी स्वतःला खूप जागरूक केले.. .माझ्या सामर्थ्यांबद्दल आणि माझ्या अपयशांबद्दल.... स्मृती मुंद्रा यांनी एवढ्या प्रचंड पसाऱ्यातून दृष्ये वेचून त्याचा सुंदर हार बनवल्याबद्दल आणि ४ भागातून प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल खूप धन्यवाद.', असे म्हणत करण जोहरने अखेरीस आदित्य चोप्राचे कौतुक केले आहे. उदय चोप्राच्या मागे आदित्यने इतकी ताकद दिल्याबद्दल आदिचे त्याने अभिनंदनही केले आहे. करणच्या या भावना इतर सेलिब्रेटींच्या मनालाही भावल्या. सुझान खानने लगेच प्रतिक्रिया देत करणने खूप चांगल्या भावना व्यक्त केल्याचे सांगितले.
'द रोमँटिक्स' या डॉक्यूमेंट्रीचे अलीकडेच लॉस एंजेलिस येथे विशेष स्क्रीनिंग झाले, त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्युमेंट-सिरीजमध्ये ऋषी कपूर यांची शेवटची मुलाखत आहे. जालंधरच्या विनम्र पार्श्वभूमीतून आलेले, यश चोप्रा यांनी चित्रपटसृष्टीत कसे भक्कम स्थान निर्माण केले, त्यांनी स्वत:चा चकचकीत आणि भव्य सिनेमा कसा तयार केला, आदित्य चोप्रा या संपूर्ण वारशाचा एक भाग कसा बनला याचा वेध द रोमँटिक या डॉक्युशन-मालिकेने घेतला आहे. (ANI)
हेही वाचा - Amazing Look Of Dharmendra : धर्मेंद्र साकारणार शेख सलीम चिस्तीची व्यक्तीरेखा, फर्स्ट लूक पाहून चाहते अवाक