ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut criticized girl : तोकड्या कपड्यात मंदिरात जाण्याला कंगना रणौतचा विरोध - कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत हिने ट्विटरवर हिमाचल प्रदेशातील एका मंदिरात लहान कपडे घालून जाणाऱ्या मुलीवर टीका केली. तिला शॉर्ट्समध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये प्रवेश नाकारला होता हा प्रसंगही तिने यावेळी सांगितला.

Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना रणौत
author img

By

Published : May 26, 2023, 1:53 PM IST

मुंबई - हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बैजनाथ मंदिरात लहान पाश्चात्य कपडे परिधान करून प्रवेश करणाऱ्या मुलीवर टीका करणाऱ्या ट्विटर युजरला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने प्रत्युत्तर दिले आहे. तिने या ट्विटशी सहमती दर्शवली आणि मुलीला 'जोकर' म्हणून उल्लेख करत नाईट ड्रेस घातल्याबद्दल त्या मुलीवर टीका केली आहे. ट्विटला उत्तर देताना तिने व्हॅटिकन सिटीमध्ये शॉर्ट्समध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याच्या तिच्या स्वतःच्या घटनेबद्दलची आठवण खुलासा म्हणून सांगितली.

ट्विटरवर एका युजरने बैजनाथ मंदिराच्या आवारात उभ्या असलेल्या दोन मुलींचे फोटो पोस्ट केले. एक मुलगी क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स घातलेली दिसते आणि दुसरी जीन्स आणि तिच्याभोवती शाल गुंडाळलेली दिसते. फोटो शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे हिमाचलच्या प्रसिद्ध शिवमंदिर बैजनाथचे दृश्य आहे. ते एखाद्या पब किंवा नाईट क्लबमध्ये गेल्यासारखे बैजनाथ मंदिरात पोहोचले आहेत. अशा लोकांना मंदिरात प्रवेश देऊ नये. माझा त्याला कडाडून विरोध आहे. हे सगळं बघून माझी विचारसरणी छोटी किंवा वाईट म्हटली तर तेही मान्य आहे!'

  • ये दृश्य है हिमाचल के प्रसिद्ध शिव मंदिर बैजनाथ का।बैजनाथ मंदिर में ऐसे पहुंचे हैं जैसे किसी पब या नाइटक्लब में गये हों ऐसे लोगों मंदिर में घुसने की अनुमति नहीं दी जानी चाहिए।मैं इसका कड़ा विरोध करता हूं
    मेरी सोच को अगर ये सब देख कर छोटा या घटिया कहा जाता है तो भी मंजूर है ! pic.twitter.com/cdxrmobZqf

    — Nikhi Uniyal (@NikhileshUniyal) May 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगनाने पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, 'हे पाश्चात्य कपडे आहेत, ज्याचा शोध गोर्‍या लोकांनी लावला आहे आणि त्याचा प्रचार केला आहे, मी एकदा व्हॅटिकनमध्ये शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालून गेले होते. तेव्हा त्यांनी मला आवारात देखील परवानगी दिली नव्हती, त्यामुळे मला माझ्या हॉटेलमध्ये परत जावे लागले. कपडे घालणारे हे विदूषक म्हणजे आळशी आणि लंगडे याशिवाय दुसरे काही नसतात. मला वाटत नाही की त्यांचा दुसरा कोणताही हेतू असेल पण अशा मूर्खांसाठी कठोर नियम असले पाहिजेत हे नक्की'.

  • These are western clothes, invented and promoted by white people, I was once at the Vatican wearing shorts and t shirt, I wasn’t even allowed in the premises, I had to go back to my hotel and change…. These clowns who wear night dresses like they are casuals are nothing but lazy… https://t.co/EtPssi3ZZj

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) May 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना हिमाचल प्रदेशातील मनालीची असून ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिच्या राज्याच्या संस्कृतीवर चर्चा करताना दिसते. कंगनाने अलीकडेच तिच्या हरिद्वारच्या प्रवासाची झलक शेअर केली होती. यामध्ये ती गंगा नदीच्या काठावर आराम करताना दिसली. वर्कफ्रंटवर, कंगना पुढे इमर्जन्सी चित्रपटामध्ये दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले आहे.

हेही वाचा - Sunny Leone Hugs Anurag Kashyap : केनेडीला मिळालेल्या 7 मिनिटांच्या स्टँडिंग ओव्हेशननंतर सनी लिओनीला अश्रू अनावर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.