ETV Bharat / entertainment

कलामहर्षी बाबूराव पेंटरना लोकमान्य टिळकांनी बहाल केली होती सिनेमा केसरी पदवी - Cinema Kesari Degree

महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना करुन कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली. भारतीय बनावटीचा कॅमेरा, खरी स्त्री पात्रे, अस्सल भारतीय कथानक, स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारे संदेश यामुळे बाबूराव पेंटर यांना लोकमान्य टिळक यांनी सिनेमा केसरी अशी पदवी दिली होती. कलामहर्षींचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमधून...

Kalamaharshi Baburao Painter
Kalamaharshi Baburao Painter
author img

By

Published : Aug 14, 2022, 7:55 AM IST

कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना इथे घडलेल्या सर्व क्षेत्रातील योगदानाची चर्चा करत असताना सिनेक्षेत्रातील एक घटना कधीही विसरता येणार नाही. ही अद्भूत गोष्ट आहे स्वतःचा कॅमेरा बनवून त्याच कॅमेऱ्याने सिनेमा बनवणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची. कोरीव काम, चित्रकला आणि मुर्तिकला यात पारंगत असलेल्या बाबूराव यांनी हा अचाट पराक्रम १०० वर्षापूर्वी भावाच्या मदतीने कोल्हापुरात केला होता.

बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९० या दिवशी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत असत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

१९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला.

कलामहर्षी बाबुराव पेंटर कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम, लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील मातीचे असो वा धातूचे ओतकाम असो, बाबुराव स्वतः ही कामे करत.

स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार करणारे पहिले भारतीय आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

भारतात सेन्सॉर पध्दतीला सुरुवात स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला तो म्हणजे ‘सैरंध्री’. पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे.

महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते.

विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला पहिला भारतीय चित्रपट त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लॅंप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय.

करमणुक कराची सुरुवात पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या सिंहगडच्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर बसविण्यात आला.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळक्यांनी घातला असला, तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस्. फत्तेलाल, विष्णूपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला. भारतीय बनावटीचा कॅमेरा, खरी स्त्री पात्रे, अस्सल भारतीय कथानक, स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारे संदेश यामुळे बाबूराव पेंटर यांना लोकमान्य टिळक यांनी 'सिनेमा केसरी' अशी पदवी दिली होती.

हेही वाचा - Laal Singh Chaddha box office day 1आमिरचे १३ वर्षातील सर्वात कमी ओपनिंग पण रक्षाबंधनाला टाकले मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.