ETV Bharat / entertainment

'बडे मियाँ छोटे मियाँ'चे काउंटडाऊन सुरू, अक्षय आणि टायगरच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला - अक्षय आणि टायगर चित्रपट

Bade Miyan Chote Miyan count down : अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची प्रतीक्षा सुरू झाली आहे. ईद दरम्यान एप्रिल 2024 मध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं काउंटडाऊन तीन महिने आधी सुरू झालं आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Bade Miyan Chote Miyan  count down :
'बडे मियाँ छोटे मियाँ'चे काउंटडाऊन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 4:53 PM IST

मुंबई - Bade Miyan Chote Miyan count down : अली अब्बास जफर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची प्रतीक्षा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारत असून याबद्दल चित्रपट रसिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच हे दोन स्टार्स अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या प्रमुख व्यक्तींनी चित्रपटाच्या रिलीज आधी 3 महिन्यांचे काउंटडाउन सुरू केले आहे. हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल.

मनोरंजक पोस्टर्स आणि झलकांसह चाहत्यांची उत्सुकता चाळवण्यात आली आहे. अक्षय आणि टायगरच्या लेटेस्ट फोटोत दोघेही हेलिकॉप्टरच्या समोर पोज देताना दिसत आहेत. ईद दरम्यान एप्रिल 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सेट केलेल्या चित्रपटाच्या रिलीजचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे.

अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोचे कॅप्शनही लक्ष वेधणारे आहे. 'बडे और छोटे से मिलने का समय हो गया है और कम', असे त्यानं लिहिलंय. यामुळे उत्सुक चाहत्यांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे. या पोस्टवर चित्रपटाच्या कलाकारांचा एक भाग असलेल्या मानुषी छिल्लरने, उत्सवाच्या इमोजीसह तिची उत्कंठा शेअर केली आहे, तर टायगर श्रॉफची आई, आयेशा श्रॉफने मनापासून इमोजीसह आनंद व्यक्त केल्याचं प्रतिक्रियांवरून दिसून येते. चाहते देखील, कलाकारांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची आतुरतेने अपेक्षा प्रतीक्षा करत आहेत, हे पोस्टच्या खाली दिलेल्या उत्साही कमेंटवरून स्पष्ट होते.

अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांचा समावेश आहे. रोमांचक स्टंट आणि आकर्षक कथानक असलेला हा चित्रपट सर्व थरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असल्याची खात्री निर्माते देत आहेत.

हेही वाचा -

  1. 'बिग बॉस 17'मध्ये विक्की जैनवर नॉमिनेशननंतर भडकली मन्नारा चोप्रा
  2. हृतिक रोशन वाढदिवस : बॉलिवूडच्या ग्रीक गॉडकडे आहेत दोन अ‍ॅक्शनर्स आणि एक सुपरहिरो फ्रँचायझी चित्रपट
  3. फराह खाननं वाढदिवसानिमित्त शेअर केला एक सुंदर व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.