ETV Bharat / entertainment

पठाण चित्रपटातील जॉन अब्राहमचा दमदार फर्स्ट लूक रिलीज - जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक

शाहरुख खानने पठाण चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. व्हिडिओमध्ये जॉनचा जबरदस्त आणि दमदार लूक पाहायला मिळत आहे.

पठाण जॉन अब्राहम FIRST LOOK
पठाण जॉन अब्राहम FIRST LOOK
author img

By

Published : Aug 25, 2022, 12:45 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. शाहरुख खानने जॉनचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये जॉन जोरदार स्टाइलमध्ये दिसत आहे.

पठाण मधील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक रिलीज करताना शाहरुख खानने म्हटलंय की हा चित्रपट करणे खूप कठीण होते. २५ जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यशराज फिल्मसचा ५० वा चित्रपट पठाणसोबत साजरा होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे.

जॉनने पठाणमधील त्याच्या फर्स्ट लूकचे फोटो शेअर केले आणि लिहिले, आयुष्यभराचे मिशन सुरू होणार आहे, २५ जानेवारी २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. चित्रपट हिंदी, तमिळ आणि रिलीज तेलुगु मध्ये रिलीज होणार.

शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्ट्स - 'पठाण' आणि 'डंकी' सारखे मोठे चित्रपट शाहरुख खानच्या बॅगेत आधीच आहेत. 'पठाण' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

त्याचवेळी शाहरुख खानने प्रसिद्ध आणि उत्तम चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत 'डंकी' हा चित्रपट साईन केला असून त्याचे शूटिंगही सुरू केले आहे. हा एक सोशल ड्रामा कॉमेडी चित्रपट असून, यात शाहरुख खान सरदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणाही शाहरुख खानने राजकुमार हिरानीसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून केली होती.

याशिवाय 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाबाबतही चाहते उत्सुक आहेत. साऊथचा दमदार अभिनेता अॅटली (अरुण कुमार) हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे.

हेही वाचा - Vijay Deverkonda Interview लायगरसाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर जावे लागल्याने विजय देवराकोंडा समाधानी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.