ETV Bharat / entertainment

Jawan box office collection day 14: 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर जवानच्या कमाईत घट - जवान चित्रपटाची कमाई

शाहरुख खानचा जवान चित्रपटाची कमाई 14 व्या 15% पेक्षा जास्त घसरण्याची शक्यता आहे. 300 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या चित्रपटाने 13 व्या दिवशी भारतातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Jawan box office collection day 14
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 2:30 PM IST

मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. 7 सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर जवाननं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कब्जा केला. भारतासह जगातील मार्केटमध्ये जवानचाच बोलबाला सुरू होता. गदर २ चित्रपटाच्या कमाईची घसरण सुरू झाल्यानंतर अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित जवान चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने केवळ 13 दिवसात 500 कोटी रुपयांच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आणि बॉक्स ऑफिसवर विक्रम केला. असे असले तरी 14 व्या दिवसानंतर मात्र चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर थोडीशी घसरण होण्याची शक्यता आहे.

जवान चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 14 व्या दिवशी 15.3% ने कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवान भारतात 14 व्या दिवशी 12 कोटी रुपयांची कमाई करेल असा होता. त्यानुसार चित्रपटाची एकूण कमाई अंदाजे एकूण 520.06 कोटी रुपये झालीय. दरम्यान, जागतिक स्तरावर जवान चित्रपटाने 12 दिवसांच्या थिएटर रननंतर 883.68 कोटी रुपयांची कमाई केल्याचं जवानच्या निर्मात्यांनी मगळवारी जाहीर केलंय.

किंग खान शाहरुख यांच्या शिवाय जवान चित्रपटात तामिळ सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या जबरदस्त भूमिका आहेत. छोट्या कॅमिओ रोलमध्ये दीपिका पदुकोणही लक्ष वेधून गेली आहे.

पठाण चित्रपटानंतर जवानला मिळालेल्या घवघवीत यशामुळे शाहरुख खाननं पुन्हा एकदा तो बॉलिवूडचा किंग खान असल्याचं सिद्ध केलंय. या वर्षाच्या अखेरीस त्याचा राजकुमार हिरानी दिगदर्शित डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

कोविडच्या काळात बॉलिवूड चित्रपटांचं भवितव्य धोक्यात आलं होतं. त्यानंतर बराच काळ थिएटर्स बंद राहिले आणि जेव्हा पूर्ववत सुरू झाले तेव्हा प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे अनेक चित्रपट रिलीजच झाले नाहीत किंवा अनेकांनी ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा फटका सहन करावा लागला होती. त्या परिस्थितीतही पुष्पा, केजीएफ, विक्रम सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांनी आपली मजबूत पकड बॉक्स ऑफिसवर ठेवली होती. या पार्श्वभूमीवर काश्मिर फाईल्स, केरळा स्टोरी यासारख्या चित्रपटांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यापार्श्वभूमीवर शाहरुख खानला पुन्हा सूर गवसला आणि पठाण चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करुन दाखवली होती. आता पुन्हा एकदा किंग खान आपला जलवा दाखवत आहे.

हेही वाचा -

१. SRK at Ambanis Ganesh :अंबानींच्या घरी गणेश दर्शनाला कुटुंबीयांसह शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री

२. Kirti Senons Ganpath first look : 'अब तू छोटी बच्ची नहीं रही'.., म्हणत किर्ती सेनॉनच्या फर्स्ट लूकवर टायगर श्रॉफची प्रतिक्रिया

३. Tamil Actor Babu Passed Away : अष्टपैलू अभिनेते बाबू यांचं निधन, अशी होती कारकीर्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.